चीनला लावणार लगाम? भारतासह चार शक्तीशाली देश आले एकत्र

quad1
quad1

टोकिओ- चीनच्या दादागिरीचा सामना करण्यासाठी अनेक देश एकत्र येताना दिसत आहेत. चीनचा भारतासोबत पूर्व लडाखमध्ये सीमा वाद आहे, तर जपानसोबत दक्षिण चीन समुद्रात वाद आहे. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसोबतही चीनचे कोणत्याना-कोणत्या मुद्यावरुन वाद आहे. अमेरिका आणि चीनमध्ये जागतिक प्रभुत्वासाठी स्पर्धा सुरु आहे. चीनने अनेक देशांना हैराण केले आहे. याच पार्श्वभूमीवर चार मोठे देश एकत्र येऊन चीनला लगाम लावण्याचा प्रयत्न करत आहेत. जपानची राजधानी टोकिओमध्ये मंगळवारी Quad देश भारत-ऑस्ट्रेलिया-अमेरिका-जपानच्या परराष्ट्रमंत्र्याची 'द क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग' (Quad) अंतर्गत बैठक पार पडत आहे. 

फौजदारी फिर्याद रद्द करण्यासाठी सुशांतच्या बहिणी मुंबई उच्च न्यायालयात

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. बैठकीमध्ये देशांमधील द्विपक्षीय संबंध आणि जागतिक स्तरावरच्या मुद्द्यांची चर्चा केली जाईल, असं जयशंकर यांनी सांगितलं आहे. या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ हेही सहभागी झाले आहेत. अमेरिकेच्या गृह विभागाने काही दिवसांपूर्वीच एक वक्तव्य जारी करुन अरुणाचल प्रदेश भारताचा एक भाग असल्याचं म्हटलं होतं. 

चीनविषयी चर्चा

चीनसोबत Quad देशांशी वाद सुरु आहे. या बैठकीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार  5G कनेक्टिविटी, सायबर सेक्युरिटी, मॅन्यूफॅक्चरिंग सेक्टरासाठी सप्लाई चेन, समुद्री वाहतुकीमध्ये सहयोग, इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिवीटी या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यासोबत दक्षिण आणि पूर्व चीन सागर, लडाखमध्ये 6 महिन्यांपासून सुरु असलेला वाद, हाँगकाँग आणि तैवानच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. 

कोरोना महामारीने सध्या जगभरात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लशीच्या वितरणाबाबतही चर्चा होणार आहे. शिवाय चीनला पर्यायी उपाय शोधले जाणार आहेत. चारी देश अंदमान समुद्रामध्ये होणाऱ्या मालाबार नौसेना अभ्यासामध्ये ऑस्ट्रेलियाचा समावेश करण्यासाठी चर्चा करणार आहेत. ऑस्ट्रेलियाला यात सहभागी करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ऑस्ट्रेलियाच्या समावेशाची घोषणा भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून होईल. मालाबार अभ्यासामुळे 'आशियाई नाटो' बनवण्याचा मार्ग मोकळा होईल, असं सांगितलं जात आहे. 

(edited by- kartik pujari)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com