
मॉस्को: भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी रशियाच्या दौऱ्यातून पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवादी धोरणांना स्पष्ट संदेश दिला आहे. मॉस्कोमध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान जयशंकर यांनी पाकिस्तानचे नाव न घेता म्हटले की, भारत आणि रशिया मिळून दहशतवादाला जोरदार प्रत्युत्तर देतील.