साहित्यिक, ज्योतिषीज्ञ वि. मा. जोशी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

साहित्यिक व ज्योतिषीज्ञ विश्वनाथ माधव जोशी यांचे नुकतेच फ्रीमोंट (कॅलिफोर्निया,अमेरिका) येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

लंडन: साहित्यिक व ज्योतिषीज्ञ विश्वनाथ माधव जोशी यांचे नुकतेच फ्रीमोंट (कॅलिफोर्निया,अमेरिका) येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

जोशी यांचे 2001 पासून लंडन (मुलीकडे), अमेरिका व भारत असे त्रिस्थळी त्यांचे वास्तव्य होते. वि. मां. चा पिंड हा मुळात कवीचा. "अक्षरे वेचिता वेचिता" या काव्यसंग्रहाव्यतिरिक्त, "चोरांचा बाजार", "प्रित आपुली" ही नाटके, चार एकांकिका, अलविदा (कादंबरी), "जावे त्याच्या वंशा" (शाहीर साबळे आत्मकथन), "लंडन लिंक" ही त्यांची साहित्यिक ग्रंथसंपदा. वि. मां.चा ज्योतिषाचाही अभ्यास दांडगा होता व त्या विषयावरील "ग्रह आदेश-व्यवसाय मार्गदर्शन" व "ग्रहाच्या प्रकाशात कलावंत" ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली. "ब्रह्मज्ञान" व "नक्षत्राचे देणे" या ज्योतिष्य विषयावरील नियतकालिकात त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले. त्यांच्या "जावे त्याच्या वंशा" या शाहीर साबळे यांच्या आत्मकथनाचे प्रकाशन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते.  

लंडनमधील वास्तव्यात महाराष्ट्र मंडळ लंडनच्या अमृत महोत्सवी स्मरणिका "अमृतवाणी" चे यशस्वी संपादन त्यांनी आपल्या लेखिका पत्नी नलिनी जोशी यांच्याबरोबर संयुक्तपणे केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: s v joshi passes away at california usa