

Donald Trump Buffalo Sacrifice
ESakal
बांगलादेशात बकरीदच्या कुर्बानीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प नावाच्या एका म्हशीची सुटका करण्यात आली आहे . राजधानी ढाकापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणगंजमध्ये वाढलेली ही चार वर्षांची म्हैस गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय ठरली होती. वृत्तानुसार, तिचे डोळे आणि केस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे दिसतात. ज्यामुळे तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.