VIDEO : रेड सीमध्ये केला अनोखा विक्रम; सलग सहा दिवस राहिला पाण्यात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

पाण्यात सर्वाधिक काळ राहून रेकॉर्ड बनवणाऱ्या या सद्दाम यांचा एक व्हिडीओदेखील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

इजिप्त : जगात असे अनेक लोक आहेत जे आपल्या जगावेगळ्या कामगिरीने चर्चेत येतात. अनेक जण चित्रविचित्र असे रेकॉर्ड करतात, जे आपल्या कधी ध्यानीमनीही नसतात. बरेचशे अशक्यप्राय असे वाटणारे रेकॉर्ड्स जगातील अनेक लोक करताना दिसतात. त्यांच्या या कर्तुत्वाने अगदी थक्क व्हायला होतं. असेच एक कर्तृत्व आता समोर आलं आहे जे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. इजिप्तमधल्या एका स्कूबा ड्रायव्हरने असा एक रेकॉर्ड केलाय जो अकल्पनीय आहे. 

हेही वाचा - BRICS Summit 2020: LAC वरील तणावादरम्यान PM मोदी-शी जिनपिंग आमनेसामने

सद्दाम अल-किलानी असं या स्कूबा ड्रायव्हरचं नाव आहे. त्याने खाऱ्या पाण्यात सर्वांत काळा राहण्याचा रेकॉर्ड केलाय. हा रेकॉर्ड करण्यासाठी सद्दाम हा तब्बल सहा दिवस पाण्यात होता. 29 वर्षांच्या सद्दाम डोहाब कोस्टवर रेड सीमध्ये 145 तास 30 मिनीट घालवले आहेत.

पाण्यात सर्वाधिक काळ राहून रेकॉर्ड बनवणाऱ्या या सद्दाम यांचा एक व्हिडीओदेखील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओच्या सुरवातीला ते स्वत:ला फिट करताना दिसत आहेत. सोबतच ते पाण्याच्या आत वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती करताना दिसत आहेत. या दरम्यानच सद्दाम यांनी पाण्याच्या आत पेंटीगदेखील केली आहे. हा व्हिडीओ Known Unknowns नावाच्या एका युट्यूब  पेजवरुन प्रसारित करण्यात आला आहे. 

हेही वाचा - रुग्णासाठी डॉक्टर झाला 'बॅटमॅन'

मिळालेल्या माहितीनुसार, वर्ल्ड रेकॉर्डची ही स्पर्धा 6 नोव्हेंबर रोजी डोहाब कोस्टमध्ये सुरु झाली होती. सद्दाम यांच्या बाहेर येण्याची वाट पाहत शेकडो स्थानिक लोक, पर्यटक आणि डायव्हींग ग्रुप्स तीन दिवस तिथेच होते. सोबतच सद्दाम यांच्या तब्यतेची काळजी घेण्यासाठी प्रत्येकवेळी पाण्याच्या आत एक मेडीकल टीम रोटेटींग शिफ्टमध्ये तैनात होते. याआधी 2016 मध्ये तुर्कीश डायव्हर चेम कराबे यांनी 142 तास 42 मिनिटांपर्यंत पाण्यात राहण्याचा रेकॉर्ड केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saddam Al-Kilany Scuba Diver Sets World Record after Spending 6 Days Underwater in Red Sea