esakal | BRICS Summit 2020: LAC वरील तणावादरम्यान PM मोदी-शी जिनपिंग आमनेसामने
sakal

बोलून बातमी शोधा

modi jinping main.jpg

बैठकीत पुढील ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे सोपवण्यात येईल. भारत 2021 मध्ये होणाऱ्या 13 व्या ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेचे यजमानपद भूषवेल.

BRICS Summit 2020: LAC वरील तणावादरम्यान PM मोदी-शी जिनपिंग आमनेसामने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि.17) ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत दहशतवाद, व्यापार, आरोग्य, ऊर्जा याबरोबरच कोरोनामुळे झालेल्या नुकसान भरपाईसारख्या मुद्द्यांवर चर्चा होईल. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोलसोनारो आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हेही या बैठकीत सहभागी होणार आहेत. 

भारत-चीनदरम्यान तणावाचे वातावरण कायम

या परिषदेचे दोन प्रमुख देश भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेवर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या चकमकीवरुन तणावाचे वातावरण आहे. त्याचवेळी ब्रिक्स देशांची परिषद होत आहे. आता दोन्ही देश उंचावरील प्रदेशातून सैनिक मागे घेण्याच्या प्रस्तावावर चर्चा करत आहेत. 

हेही वाचा- कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या हत्येप्रकरणी कलेक्टरवरच हत्येचा गुन्हा दाखल

नुकताच पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांची शांघाय सहयोग संघटनेच्या (एससीओ) डिजिटल बैठकीत समोरासमोर झाली होती. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान मोदी हे रशियाने आयोजित केलेल्या ब्रिक्स देशांच्या 12 व्या शिखर परिषदेत सहभागी होतील. मंगळवारी होत असलेल्या या बैठकीचे मुख्य विषय हे जागतिक स्थिरता, सुरक्षा आणि नवप्रवर्तक विकास हे आहेत. 

हेही वाचा- स्वदेशी लस भारत बायोटेकची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी; 26 हजार व्हॉलेंटीअर्स होणार सहभागी

पुढील ब्रिक्स परिषदेचे यजमानपद भारताकडे

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, बैठकीत पुढील ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे सोपवण्यात येईल. भारत 2021 मध्ये होणाऱ्या 13 व्या ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेचे यजमानपद भूषवेल. तत्पूर्वी, भारताने 2012 आणि 2016 मध्ये ब्रिक्स देशांच्या शिखर संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. ही बैठक भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 4.30 वाजता सुरु होईल.

हेही वाचा- शस्त्राने शीर केलं धडावेगळं; मदुराईत दिवसाढवळ्या नृशंस हत्या 

BRICS काय आहे

ब्रिक्स एक प्रभावशाली संघटना आहे. जगातील एकूण लोकसंख्येपैकी अर्ध्याचे हे सर्व देश प्रतिनिधीत्व करतात. ब्रिक्स देशांचे संयुक्त रुपाने जीडीपी हा 16.6 ट्रिलियन अमेरिकन डॉलर आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, बैठीकत सहभागी होणारे नेते सहकार्य आणि दहशतवाद, व्यापार, आरोग्य, ऊर्जाबरोबरच कोरोनामुळे झालेल्या नुकसानीवर उपाययोजना शोधण्यासाठी चर्चा करतील.