पगार बावीसशे पौंड; मास्कसाठी नऊशे पौंड

Mask
Mask

कैरो - ‘माझे वेतन बावीसशे इजिप्शीयन पौंड आहे, तर सहा जणांच्या कुटुंबासाठी दररोज ३० पौंड या हिशेबाने मला दरमहा नऊशे पौंड मास्कसाठी मोजावे लागतील. हा खर्च मला कसा झेपणार,’ असा प्रश्न एस्साम सईद याने केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कैरोच्या दक्षिणेतील बेनी स्युएफ येथील शिक्षण संचालनालयात तो नोकरी करतो. त्याच्यासारखाच हा प्रश्न अनेकांसमोर आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे सरकारने सक्तीचे केले आहे. अन्यथा तब्बल चार हजार पौंड दंड ठोठावला जाईल असा इशारा दिला आहे. शनिवारपासून हा नियम लागू झाला आहे. त्यामुळे लाखो गरीब लोक चिंतेत पडले आहेत.

मध्य कैरोमधील एका दुकानात मास्क घालून थांबलेल्या आयसीस या युवकाने सांगितले की, ‘मास्कचा नियम सुरवातीपासून लागू होणे अपेक्षित होते. त्यामुळे लोक शिस्त पाळण्यास शिकले असते. आमच्या देशाला शिस्तीची गरज आहे.’

ईजिप्तमध्ये सुमारे २५ हजार रुग्ण व ९५० मृत्यू अशी कोरोनाची आकडेवारी आहे. गेल्या आठवड्यात ईदनंतर रुग्णांच्या संख्येत बरीच वाढ होऊ लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com