'मला रोज 18 जणांसोबत सेक्स करावं लागायचं, म्हणून...

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 जानेवारी 2019

'मला रोज 18 जणांसोबत सेक्स करण्यासाठी जबरदस्ती केली जायची', असं धक्कादायक वास्तव सांगणारी आत्मकथा नेदरलँडमधील 19 वर्षीय युवतीने लिहली आहे. यामध्ये तिने पुढे म्हटले आहे की, 'झालेल्या गोष्टी मी विसरून जावं यासाठी मला कोकेन देण्यात येत, असल्याचंही तिने आत्मकथेत सांगितले आहे.

नेदरलँड- 'मला रोज 18 जणांसोबत सेक्स करण्यासाठी जबरदस्ती केली जायची', असं धक्कादायक वास्तव सांगणारी आत्मकथा नेदरलँडमधील 19 वर्षीय युवतीने लिहली आहे. यामध्ये तिने पुढे म्हटले आहे की, 'झालेल्या गोष्टी मी विसरून जावं यासाठी मला कोकेन देण्यात येत, असल्याचंही तिने आत्मकथेत सांगितले आहे.

19 वर्षाची युवती नर्सची नोकरी करण्यासाठी एम्सटर्डमला गेली होती. पण तिथे एअरपोर्टच्या बाहेर येताच तिचा पासपोर्ट चोरी करण्यात आला आणि या कहानीची सुरुवात झाली. पासपोर्ट चोरल्यानंतर या तरुणीला 18 पुरुषांकडून सेक्ससाठी जबरदस्ती करण्यात आली. ही कहानी ब्रिटनच्या साराची आहे. त्या आता 42 वर्षांच्या आहेत. 'स्लेव गर्ल' अशा नावाने साराने आत्मकथा लिहली आहे. त्यात त्यांनी हे भयानक आणि धक्कादायक अनुभव लिहले आहेत.

सारा या नोकरीची जाहिरात पाहून एम्सटर्डमला गेल्या होत्या. ती जाहिरात एका ब्रिटिश गुन्हेगार जॉन रीसीने प्रकाशित केली होती. जॉनने खोटी जाहिरात दाखवून हा सापळा रचला असल्याचं सारा म्हणतात. एअरपोर्टवर जाताच सारा जॉनला भेटल्या आणि त्याने बंदूकीच्या धाकावर त्यांना पळवून नेलं. सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्यांना धकम्या देऊन वेश्या वस्तीत नेलं आणि 20-20 लोकांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली.

1997मध्ये सारा या मानवी तस्करी करणाऱ्या टोळीच्या तावडीतून सुटल्या. त्यावेळी त्यांना बेल्जियमच्या एका सुरक्षित ठिकाणी गेल्या. या सगळ्या प्रकारानंतर त्यांनी अपहरण आणि अत्याचार करणाऱ्यांविरोधात पुरावे पोलिसांच्या हाती दिले आणि यात पोलिसांनी 5 लोकांना ताब्यात घेतलं. दरम्यान, या सगळ्या प्रकाराला आता खूप वर्ष उलटून गेली पण, 'आजही माझ्या स्वप्नात मी जॉनला पाहते' असं सारा म्हणतात. हे सगळं आता त्यांनी 'स्लेव गर्ल' या आपल्या आत्मकथनातून मांडले आहे.

Web Title: salve girl story of british woman abduct in her teen age