चीनच्या राष्ट्रपतींना 19 वेळा भेटून मोदींनी काय साधले ?,पृथ्वीराज चव्हाणांचा टाेला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

चीनकडून पंतप्रधानांना डोनेशन मिळाल्याचा आरोप मंत्री थोरात यांनी केला आहे, याबाबत विचारले असता श्री. चव्हाण म्हणाले, ""पीएमना व्यक्तिगत डोनेशन मिळाले, की त्यांच्या नावाने असलेल्या फंडाला मिळाले याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.''

सातारा : सर्वच पातळीवर केंद्रातील सरकार नेतृत्वहिन झाले असून, त्यांचे हातपाय गळालेले आहेत. त्यामुळेच चीनसारखा प्रश्‍न निर्माण झाला आहे. चीनच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 19 वेळा भेटले. काय झाले? वैयक्तिक मैत्रीतून त्यांना अहमदाबादला आणून झोपाळ्यावर खेळविले. ते लोकही चांगली वागणूक मिळाल्याने खुश झाले. अशातून परराष्ट्र धोरण ठरत नाही. परराष्ट्र धोरणात कोणी कायमस्वरूपी शत्रू व मित्र नसतो. देशाचे हितसंबंध महत्त्वाचे असतात. अशा पद्धतीने देशाचे परराष्ट्र धोरण राबवत असाल, तर देशाची सुरक्षितता कोणाच्या हातात, असा प्रश्‍न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
 
चीनच्या प्रश्‍नावर विरोधी पक्ष म्हणून आम्हाला उत्तरे मिळाली पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे; पण पंतप्रधान मोदी यांच्याकडून योग्य उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे आम्ही चीनप्रश्‍नी विचारणारच, असे सांगून चव्हाण म्हणाले, ""कोणाच्याही व्यक्तिगत मैत्रीवर परराष्ट्र धोरण ठरत नाही. मोदींना वाटते, की शपथविधीला सगळ्यांना बोलावले, की सगळे झाले. नवाज शरीफ यांच्या वाढदिवस व लग्नाला गेले, की भारत- पाक प्रश्‍न सुटतील. तेथे गेल्यानंतर काय झाले? चीनच्या राष्ट्रपती जिनपिंग यांना मोदी स्वत: तब्बल 19 वेळा भेटले होते. भारताच्या इतिहासात कुठलाही पंतप्रधान चीनच्या राष्ट्रपतींना इतक्‍या वेळा भेटलेला नाही. कदाचित औपचारिक दोनदा तीनदा भेटी झाल्या असतील. '' 

चीनकडून पंतप्रधानांना डोनेशन मिळाल्याचा आरोप मंत्री थोरात यांनी केला आहे, याबाबत विचारले असता श्री. चव्हाण म्हणाले, ""पीएमना व्यक्तिगत डोनेशन मिळाले, की त्यांच्या नावाने असलेल्या फंडाला मिळाले याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.''

Video : मोदी सरकार एका हातानं देतंय, दुसऱ्या हातानं घेतंय : पृथ्वीराज चव्हाण

राज्यातील प्रवासासाठी' हे' आवश्यक : गृहमंत्री अनिल देशमुख

कोरोनाशी लढण्यासाठी ही दाेन औषधे खरेदी करणार : गृहमंत्री अनिल देशमुख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Congress Leader Prithviraj Chavan Critices Prime Minister Narendra Modi On China President JinPing Meeting