

Horrific Crash 42 Pilgrims Killed Driver Survives in Madina Accident
Esakal
Saudi Arabia Accident: सौदी अरेबियात मक्केहून मदीनेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसचा भीषण अपघात झाला. रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बसची डीझेल टँकरला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की बसला आग लागून बस जळून खाक झाली. या दुर्घटनेत ४२ भारतीय यात्रेकरूंचा मृत्यू झाला. तर बसचा चालक मोहम्मद अब्दुल शोएब आश्चर्यकारकरित्या बचावला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.