

Saudi Arabia executed a Bangladeshi man and woman in the Makkah province.
esakal
Saudi Arabia Execution: सौदी अरेबियाने १४ ऑक्टोबर रोजी मक्का प्रांतात एका बांगलादेशी पुरुष आणि महिलेला फाशी दिली. मक्का येथील एका मशिदीत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांना दोषी ठरवले होते. सौदी अरेबियाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात इस्लामिक कायद्यातील 'ताझिर' (Ta'zir) या तरतुदीअंतर्गत मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या कायद्यानुसार, गुन्ह्याचे स्वरूप आणि परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षा निश्चित करण्याचा अधिकार न्यायाधीशांना असतो.