सौदी अरेबियात कामासाठी जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी महत्त्वाची बातमी; नवा नियम जाणून घ्या

भारतातील अनेकजण कामगार म्हणून सौदी अरेबियामध्ये जात असतात. सौदीने घरगुती कामगारांसाठीच्या नियमात एक महत्त्वाचा बदल केला आहे
saudi arabia new rules for indian home worker 2023 crown prince Mohammed bin Salman
saudi arabia new rules for indian home worker 2023 crown prince Mohammed bin Salman

नवी दिल्ली- भारतातील अनेकजण कामगार म्हणून सौदी अरेबियामध्ये जात असतात. सौदीने घरगुती कामगारांसाठीच्या नियमात एक महत्त्वाचा बदल केला आहे. सौदी सरकारची अधिकृत वेबसाईट सौदी गॅजेटमध्ये याची माहिती देण्यात आली आहे. सौदीने विदेशी घरगुती कामगारांसाठीच्या व्हिसा देण्याच्या नियमात कठोरता आणली आहे.

सौदी सरकारनुसार, नव्या नियमांतर्गत सौदीतील अविवाहित महिला किंवा पुरुषाला विदेशी घरघुती कामगाराला कामावर ठेवणे अवघड जाणार आहे. आता सौदीच्या अविवाहित नागरिकाला २४ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच घरगुती कामासाठी विदेश कामगाराला कामावर ठेवता येणार आहे. या अटीची पूर्तता झाल्यानंतरच विदेशी व्यक्तीला व्हिसा दिला जाणार आहे.

saudi arabia new rules for indian home worker 2023 crown prince Mohammed bin Salman
World Cup Football : २०३४ मधील विश्‍वकरंडक फुटबॉल सौदी अरेबियात? यजमानपदातून ऑस्ट्रेलियाची माघार

मोठ्या संख्येने भारतीय नागरिक सौदीमध्ये कामासाठी जात असतात. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, जवळपास २६ लाख भारतीय सौदी अरेबियात काम करत आहेत. यापुढे भारतासह इतर देशातील नागरिक २४ वर्ष पूर्ण झालेल्या अविवाहित सौदी नागरिकाच्या घरी काम करु शकणार आहे.

रिपोर्टनुसार, घरगुती कामगारांच्या भरतीसाठी एका वेगळ्या Musaned व्यासपीठाची स्थापना केली जाणार आहे. यानुसार, कामगारांना व्हिसा दिला जाणार आहे. तसेच कामगारांचे कर्तव्य, अधिकार याची माहिती येथेच दिली जाणार आहे. घरगुती श्रम बाजारामध्ये सुव्यवस्था आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सौदीच्या मानव संसाधन मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

saudi arabia new rules for indian home worker 2023 crown prince Mohammed bin Salman
Pakistan Crisis : पाकिस्तानची सवय जाईना! आता चीन अन् सौदी अरेबियासमोर पसरले हात; मागितली 11 अब्ज डॉलर्सची मदत

नव्या व्यासपीठावर पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच Musaned या व्यासपीठावरुन वादांचे निराकरण देखील केले जाणार आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, तसेच नियुक्ती करणारा आणि श्रमिक कामगार यांच्यामधील अधिकार सुनिश्चित करण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरणार आहे. घरगुती कामगारांमध्ये विविध श्रेणी आहेत. यात नौकर, सफाई कर्मचारी, गार्ड, शेतकरी, शिंपी, लिव्ह-इन-नर्स, ट्यूटर, स्वंयपाकी यांचा समावेश होतो. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com