esakal | रहस्यमयी तलाव! पाण्याला स्पर्श करताच प्राणी दगडामध्ये बदलतात
sakal

बोलून बातमी शोधा

bird

पर्यावरण तज्ज्ञ आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफर Nick Brandt यांनी तलावाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि काही फोटो काढले

रहस्यमयी तलाव! पाण्याला स्पर्श करताच प्राणी दगडामध्ये बदलतात

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

सर्वसाधारण, तलाव सुंदरता आणि अल्हाददायक शांतता देण्यासाठी जवळपास सगळ्यांना हवाहवासा वाटतो, पण जगामध्ये अनेक रहस्यमयी तलाव आहे, ज्यांच्याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. उत्तर तंजानियामधील नेट्रॉल तलाव या यादीमध्ये सगळ्यात वरती येते. म्हटलं जातं की या तलावाच्या पाण्याला जो कोणी स्पर्श करतो, तो दगडाचा होऊन जातो. तलावाच्या जवळपास अनेक प्राणी आणि पक्ष्यांच्या मूर्ती दिसून येतात. त्यामुळे खरंच या तलावामध्ये काही रहस्यमयी शक्ती आहे का, जी सर्वांना दगडामध्ये बदलले. जाणून घेऊया...

चीनला भारत देणार टक्कर; खेळण्यांच्या पहिल्या क्लस्टरची कर्नाटकमध्ये पायाभरणी

तंजानियाच्या अरुषा भागात असलेल्या या तलावाच्या जवळपास मानवीवस्ती नाही. तलावाच्या जवळ अनेक दगडाच्या मूर्ती पडलेल्या सापडतात, त्यामुळे तलावात काही अद्भूत शक्ती असल्याची शंका येते, पण असं काही नाही. हे सर्व तलावाच्या रासायनिक पाण्यामुळे होते. नेट्रॉन एक अल्केलाईन तलाव आहे, ज्यात सोडियम कार्बोनेटचे प्रमाण जास्त आहे. पाण्यातील अल्कलाईनची मात्रा अमोनिया इतकी आहे. 

पर्यावरण तज्ज्ञ आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफर Nick Brandt यांनी तलावाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि काही फोटो काढले. त्यांनी यासंबंधी एक पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकामध्ये तलावासंबंधी अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. पण, प्राणी आणि पक्ष्यांचा मृत्यू का झालाय याबाबत त्यांनाही नक्की माहिती नाही. 

नेट्रॉनसोबत आणखी काही तलाव आहेत, ज्यांनी लोकांना बुचकळ्यात टाकलं आहे. रवांडाच्या किवू तलावालाही विशेष महत्व आहे. या तलावाबाबत खूप कमी माहिती आहे. या तलावाच्या पाण्यात कार्बन डायऑक्साईड आणि मोठ्या प्रमाणात मिथेन गॅस आढळते. 

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणखी एका राज्याने केली मोफत लशीची घोषणा

अमेरिकेचे मिशिगन तलावही धोकादायक आहे. 1986 मध्ये या तलावातून जीवघेणी गॅस बाहेर पडली. ज्यामुळे 1,746 लोकांसह हजारो प्राण्यांचा मृत्यू झाला होता. या तलावाच्या तळाला ज्वालामुखी असल्याचं सांगितलं जातं. रशियामधील बॉस्नो तलावही असाच धोकादायक आहे. या तलावामधून कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे बाहेर येत असतात. त्यामुळे मानसांसाठी हा तलाव जीवघेणा ठरतो.