हरणांना ओमिक्रॉनची लागण!अमेरिकेतील प्राण्यापर्यंत पोहोचला कोरोना

अमेरिकेच्या कृषी विभागाने देशातील 13 राज्यांमध्ये हरणांना संसर्ग झाल्याचे सांगितले आहे.
Omicron Symptoms found In Deer
Omicron Symptoms found In Deeresakal

कोरोना रूग्ण कमी झाल्याने सध्या अनेकांना दिलासा मिळाला आहे. पण, आता प्राण्यांमध्येही कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. न्यू यॉर्क शहरातील हरणांमध्ये ओमिक्रॉनचा (omicron) संसर्ग आढळून आला आहे. तिथल्या वन्य प्राण्यामध्ये पहिल्यांदाच विषाणू आढळून आला आहे. अमेरिकेत हरीण (Deer) मानवी वस्तीच्या खूप जवळ राहतात आणि विषाणू संसर्ग पसरवू शकतात, यामुळे चिंता वाढू शकते. न्यूयॉर्कच्या स्टेटन बेटावर 131 पांढऱ्या रंगाची हरीणं पकडली. त्या हरणांच्या रक्त आणि काही अनुनासिक स्वॅबच्या नमुन्यांवरून त्यांच्या 15% अँटीबॉडीज सकारात्मक आहेत. त्यामुळे हरणे SARS-CoV-2- चे वाहक झाले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. महत्वाचे म्हणजे, अमेरिकेच्या कृषी विभागाने देशातील 13 राज्यांमधील हरणांमध्ये संसर्ग झाल्याचे सांगितले आहे.

Omicron Symptoms found In Deer
Diabetes असताना रात्रीचा रक्तदाब वाढतोय? जीवाचा धोका आत्ताच ओळखा

संशोधकांच्या मते, हा संसर्ग मानवाकडून (Human) हरणांमध्ये पसरतो. नंतर ते इतर हरणांना संक्रमित करत आहे. मात्र हरणांमधून पुन्हा मानवांमध्ये संक्रमण झाल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. पण, दीर्घकाळापर्यंत हरणांमध्ये संसर्ग पसरल्याने विषाणूचे उत्परिवर्तन होऊ शकते, त्यामुळे नवीन स्ट्रेन मानवांमध्ये आणि प्राण्यांमध्ये पसरू शकतो, पण हरणांमधून हा विषाणू परत माणसांमध्ये पसरतो असे नाही.

Omicron Symptoms found In Deer
Blood Sugar Level वयानुसार किती असावी? जाणून घ्या

संशोधकांना आयोवामध्ये सप्टेंबर 2020 पर्यंत हरणांमध्ये कोरोना विषाणूचे काही नमुने आढळले आहेत. यू.एस. कृषी विभागाच्या प्राणी आणि वनस्पती आरोग्य तपासणी सेवेनुसार, कोविड-संक्रमित हरण इलिनॉय, मिशिगन, न्यूयॉर्क, पेनसिल्व्हेनिया आणि ओहायोसह अनेक राज्यांमध्ये सापडले आहेत.

Omicron Symptoms found In Deer
पुरूषांनो, सतत मोबाईल बघितल्याने होतोय तुमच्या शुक्राणूंवर परिणाम! अभ्यासात स्पष्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com