Diabetes असताना रात्रीचा रक्तदाब वाढतोय? जीवाचा धोका आत्ताच ओळखा

टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेह असलेल्या रूग्णांची रक्तदाबाची पातळी नियंत्रणात असणे महत्वाचे आहे
Diabetes, high blood pressure risk more
Diabetes, high blood pressure risk more
Summary

21 वर्षांपासून केलेल्या या अभ्यासाचा हा निष्कर्ष नुकताच अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या हायपरटेन्शन सायंटिफिक सेशन्स 2021 मध्ये प्रकाशित झाला आहे. अभ्यासानुसार, ज्या मधुमेही रुग्णांचा रक्तदाब रात्री झोपताना वाढतो त्यांनी खूप काळजी घेणे गरजेचे आहे. रात्री रक्तदाब वाढणे अशा लोकांसाठी धोक्याचे ठरू शकते.

जर तुम्हाला मधूमेह असेल तर काही वेळा रात्री तुमचा रक्तदाब वाढू शकतो. यामुळे तुम्हाला धोका निर्माण होतो. एका अभ्यासानुसार टाईप १ आणि टाईप २ च्या मधुमेह (Diabetes) असलेल्या रूग्णांचा रात्री अचानक रक्तदाब वाढतो. त्यामुळे झोपेच्या वेळी रक्तदाब (Blood Pressure) कमी असलेल्या रुग्णांपेक्षा अशा लोकांच्या मृत्यूचे (Death) प्रमाण जास्त असते.

Diabetes, high blood pressure risk more
Blood Sugar Level वयानुसार किती असावी? जाणून घ्या
bp problem at night
bp problem at nightesakal

रात्री रक्तदाब वाढणे धोकादायक आहे का ?

टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेह असलेल्या रूग्णांची रक्तदाबाची पातळी नियंत्रणात असणे महत्वाचे आहे. 21 वर्षांपासून केलेल्या या अभ्यासाचा हा निष्कर्ष नुकताच अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या हायपरटेन्शन सायंटिफिक सेशन्स 2021 मध्ये प्रकाशित झाला आहे. अभ्यासानुसार, ज्या मधुमेही रुग्णांचा रक्तदाब रात्री (Night)झोपताना वाढतो त्यांनी खूप काळजी घेणे गरजेचे आहे. कारण रात्री रक्तदाब वाढणे अशा लोकांसाठी धोक्याचे ठरू शकते.

Diabetes, high blood pressure risk more
व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास १४ पट वाढतो कोरोनाचा धोका, अभ्यासात स्पष्ट

मधुमेह असलेल्यांना धोका

हा अभ्यास 21 वर्षांच्या अभ्यासावर आधारित आहे. ज्या लोकांचा रक्तदाब रात्री स्थिर किंवा कमी असतो, त्यांच्या तुलनेत मधुमेही रूग्णांना रात्री रक्तदाब वाढण्याचे प्रमाण दुप्पट असते, असे शास्त्रज्ञांना आढळून आले. जेव्हा एखादी व्यक्ती रात्री झोपते तेव्हा त्याचा रक्तदाब कमी असतो. पण रात्रीच्या वेळी रक्तदाब पुरेशा प्रमाणात कमी झाला नाही, तर त्याला नॉन डिपिंग म्हणतात. दिवसाच्या तुलनेत रात्री रक्तदाब वाढतो, तेव्हा या प्रक्रियेला रिव्हर्स डिपिंग म्हणतात. ही परिस्थिती अधिक धोकादायक असल्याचे अभ्यासात सिद्ध झाले आहे.

Diabetes, high blood pressure risk more
नवा फिटनेस ट्रेंड Plogging कसा आहे? त्याचे आरोग्य, पर्यावरणाला होतात पाच फायदे
Diabetes
Diabetessakal

रिव्हर्स डिपिंगची समस्या कशी असते?

टाईप १ किंवा टाईप २ मधुमेह असलेल्या रूग्णांमध्ये, प्रत्येकी 10 पैकी एका व्यक्तीला रिव्हर्स डिपिंगची समस्या असू शकते, असे अभ्यासात समोर आले आहे. इटलीच्या पिसा विद्यापीठाच्या क्लिनिकल आणि प्रायोगिक औषध विभागातील अन्वेषक मार्टिना चिरियाको यांच्या म्हणण्यानुसार, टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांनी नियमितपणे रक्तदाबासाठी तपासणी केली पाहिजे. कारण त्यांच्या मृत्यूचा धोका दुप्पट होऊ शकतो

Diabetes, high blood pressure risk more
झोपण्याआधी गाणी ऐकताय! सवय पडू शकते महागात
बीपी
बीपीesakal

जगण्याची शक्यता कमी

१९९९ साली इटलीच्या पीसामधील मधुमेह असलेल्या ३५९ वयोवृद्ध लोकांवर अभ्यास करण्यात आला. अभ्यासात सहभागी झालेल्या अर्ध्याहून जास्त लोकांचा रक्तदाब रात्री वाढलेला होता, असे संशोधकांना आढळले. यात २० टक्के लोकांचा रक्तदाब दिवसाच्या तुलनेत रात्री वाढलेला होता म्हणजेच त्यांना रिव्हर्स डिपरची समस्या होती. रिव्हर्स डिपर्सपैकी एक तृतीयांश लोकं कार्डियाक ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीने ग्रस्त होते.

Diabetes, high blood pressure risk more
नाश्ता, जेवणाची योग्य वेळ कोणती? आयुर्वेद काय सांगते जाणून घ्या!

या नसांना इजा होण्याची भिती

कार्डियाक ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीमध्ये, हृदय - रक्तवाहिन्या नियंत्रित करणाऱ्या नसा खराब होतात. यामुळे रक्तदाब आणि हृदयाच्या गतीवर प्रभाव पडून हृदयविकार आणि मृत्यूचा धोका वाढवते. डिपर्सच्या तुलनेत रिव्हर्स डिपर असलेल्या लोकांची जगण्याची शक्यता अडीच वर्षांनी कमी होते. तर तर नॉन-डिपर असलेल्या लोकांची जगण्याची शक्यता १.१ वर्षांनी कमी होते, असेही या अभ्यासात आढळून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com