esakal | फोटोशॉप नाही हे खरंय! जहाज हवेत तरंगणाऱ्या फोटोमागचं सत्य जाणून घ्या

बोलून बातमी शोधा

scotland ship}

एक मोठं जहाज हवेत तरंगताना फोटोमध्ये दिसत आहे. या फोटोची जगभरात चर्चा होत असून काहींनी हे फोटोशॉप असल्याचं म्हटलं होतं.

फोटोशॉप नाही हे खरंय! जहाज हवेत तरंगणाऱ्या फोटोमागचं सत्य जाणून घ्या
sakal_logo
By
टीम ई सकाळ

एडिनबर्ग - सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. व्हिडीओ, फोटोंच्या माध्यमातून अनेक चित्र विचित्र गोष्टी फॉरवर्ड होत असतात. आताही अशाच एका फोटोची चर्चा होत आहे. यामध्ये एक मोठं जहाज हवेत तरंगताना फोटोमध्ये दिसत आहे. या फोटोची जगभरात चर्चा होत असून काहींनी हे फोटोशॉप असल्याचं म्हटलं होतं.

व्हायरल होत असलेल्या या जहाजाची तुलना द एवेंजर्स चित्रपटातील जहाजाशी केली जात आहे. यामध्ये निक फ्यूरी सर्व सुपरहिरोंना एका जहाजातून घेऊन जातो. ते जहाज काही वेळातच हवेत तरंगायला लागतं. खरंतर तो एक काल्पनिक सीन होता मात्र सध्या सोशल मीडीयावर व्हायर होत असलेल्या फोटोमद्ये एक मोठं जहाज पाण्याच्या वर हवेत उडताना दिसत आहे.

जहाज हवेत तरंगत असल्यासारखं दिसल्याची घटना ही स्कॉटलंडमधील असल्याची सांगितलं जात आहे. तिथं 23 वर्षीय कॉलिन मॅक्युलम रस्त्यानं जात असताना समुद्र किनाऱ्यावर हवेत एक जहाज उडताना दिसलं. तेव्हा त्यानं लगेच फोटो टिपले आणि सोशल मीडियावर टाकले. गेल्या आठवड्यातील ही घटना जगभरात चर्चेचा विषय बनली.

हे वाचा - सलग तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड हादरलं; नॉर्थ आयर्लंडला 6.4 रिश्टर स्केलचा धक्का

समुद्र किनाऱ्यावरची ही घटना असून मॅक्युलम जिथून जात होता तिथं एक जहाज पाण्यात उभा होतं. तिथंच वरती ढग जमा झाले होते. यामुळे समुद्राच्या काही भागावर त्याची सावली पडली होती. तिथं पाणी वेगळं दिसत होतं आणि आत दूरवर असलेलं जहाज हवेत असल्याचा भास होत होता. मॅक्युलमने याची माहिती फेसबुकवर दिली आहे. त्यानं म्हटलं की, पहिल्यांदाच असं दृश्य पाहिलं.