स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा सार्वमत

वृत्तसंस्था
रविवार, 12 मार्च 2017

लंडन : स्वातंत्र्यासाठी दुसऱ्यांदा सार्वमत चाचणी घेणे अगदी बरोबर आहे असे मत मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी व्यक्त केले आहे. ब्रिटनपासून बाहेर पडून स्वतंत्र देश बनविण्यासाठी स्कॉटलंड पुन्हा सार्वमत घेणार आहे. पुढील वर्षाच्या (2018) अखेरीस ही सार्वमत चाचणी घेतली जाईल, असे स्कॉटलंडच्या प्रथम मंत्री निकोला स्टर्जन यांनी म्हटले आहे.

स्कॉटलंडला सार्वमत चाचणी घेण्यापासून रोखणे अशक्य असल्याचे ब्रिटनही जाणते. आता सार्वमताचा दिवस निश्चित करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय ब्रिटनच्या सरकारपुढे नाही. 
"हे होणारच होते. हे रोखण्याच्या स्थितीत आम्ही आहोत असे मला वाटत नाही. युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडण्याच्या बरोबर आधी ही सार्वमत चाचणी घेण्यात येईल," असे 'फायनान्शियल टाईम्स'शी बोलताना जेरेमी यांनी सांगितले  

यापूर्वी स्कॉटलंडमध्ये स्वातंत्र्यासाठी सप्टेंबर 2014 मध्ये सार्वमत घेण्यात आले होते. त्यावेळी 55 टक्के लोकांनी ब्रिटनपासून स्वतंत्र होण्यास विरोध दर्शविला होता. त्यावेळी ब्रिटन युरोपीय संघातच राहील, अशी लोकांना अपेक्षा होती. मात्र, ब्रिटन युरोपीय संघातून बाहेर पडला, तर स्कॉटिश नागरिकांना युरोपीय संघातच राहायची इच्छा आहे.

स्कॉटलंड नेब्रिटनपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला, तर जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या ब्रिटनकरिता हा मोठा धक्का ठरेल. गेल्या वर्षी 23 जून 2016 रोजी युरोपीय संघातून वेगळे होण्यासाठी ब्रिटनमध्ये सार्वमत घेण्यात आले. इंग्लंड आणि वेल्सने युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी मत दिले. तर उत्तर आयर्लंड आणि स्कॉटलंडने युरोपीय संघातच राहण्यासाठी मत दिले. 
 
Web Title: scotland to go for referendum again