
Sebastien Lecornu
sakal
पॅरिस : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी मंगळवारी (ता. ९) रात्री उशिरा उशिरा ३९ वर्षीय संरक्षणमंत्री सेबॅस्टियन लेकोर्नू यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या फ्रान्सच्या अर्थसंकल्पावर सर्व राजकीय पक्षांचे एकमत व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचे महत्त्वाचे काम मॅक्रॉन यांनी सेबेस्टियन यांच्यावर सोपवले आहे.