चीनमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट

यूएनआय
शुक्रवार, 31 जुलै 2020

चीनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शंभरहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे चीनमध्ये संसर्गाची दुसरी लाट येत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली असून सरकारने चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे. देशभरात गेल्या चोवीस तासांमध्ये १०५ रुग्ण आढळून आले आहेत.

बीजिंग - चीनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शंभरहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे चीनमध्ये संसर्गाची दुसरी लाट येत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली असून सरकारने चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे. देशभरात गेल्या चोवीस तासांमध्ये १०५ रुग्ण आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यापैकी ९६ जण हे शिनजिआंग प्रांतातील आहेत. या प्रांतात उइगर मुस्लिमांची संख्या अधिक असल्याने, आधीच या समुदायावर अत्याचार करत असल्याचा आरोप असलेले चीन सरकार कोरोनाचे कारण देत कठोर निर्बंध लागू करणार असल्याचा विश्‍लेषकांचा अंदाज आहे.

नकाशात छेडछाड करणाऱ्या नेपाळकडून आता नागरिकांच्या घुसखोरीचेही समर्थन

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: second wave of corona infection in China