esakal | नकाशात छेडछाड करणाऱ्या नेपाळकडून आता नागरिकांच्या घुसखोरीचेही समर्थन
sakal

बोलून बातमी शोधा

India-and-Nepal

भारतातील कालापानी, लिम्पियाधुरा आणि लिपुलेखसह ३९५ चौरस किलोमीटरचा भाग जबरदस्तीने आपल्या नकाशात घुसवणाऱ्या नेपाळने आता या भागातील नेपाळी नागरिकांच्या घुसखोरीचेही समर्थन केले आहे. सुगौली कराराच्या कलम ५ आणि नकाशा तसेच ऐतिहासिक पुराव्याच्या आधारावर कालापाणी, लिम्पियाधुरा आणि लिपूलेख क्षेत्र नेपाळचे असल्याचा दावा नेपाळच्या धारचुलाच्या जिल्हा प्रशासनाने भारताला दिलेल्या उत्तरात केला आहे.

नकाशात छेडछाड करणाऱ्या नेपाळकडून आता नागरिकांच्या घुसखोरीचेही समर्थन

sakal_logo
By
पीटीआय

काठमांडू - भारतातील कालापानी, लिम्पियाधुरा आणि लिपुलेखसह ३९५ चौरस किलोमीटरचा भाग जबरदस्तीने आपल्या नकाशात घुसवणाऱ्या नेपाळने आता या भागातील नेपाळी नागरिकांच्या घुसखोरीचेही समर्थन केले आहे. सुगौली कराराच्या कलम ५ आणि नकाशा तसेच ऐतिहासिक पुराव्याच्या आधारावर कालापाणी, लिम्पियाधुरा आणि लिपूलेख क्षेत्र नेपाळचे असल्याचा दावा नेपाळच्या धारचुलाच्या जिल्हा प्रशासनाने भारताला दिलेल्या उत्तरात केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारत-नेपाळ सीमेलगत असलेल्या कालापानी, लिम्पियाधुरा आणि लिपूलेख येथे बेकायदापणे घुसखोरी करणाऱ्या नेपाळी नागरिकांना रोखण्याचे आवाहन भारताने जुलैच्या प्रारंभीच केले होते. यासंबंधी धारचुला (पिथौरागड, उत्तराखंड) चे उपजिल्हाधिकारी अनिल कुमार यांनी नेपाळ प्रशासनाला पत्र लिहले. या पत्राला आता नेपाळने प्रत्युत्तर दिले.

राम मंदिराच्या भूमिपूजनाची अमेरिकेतही चर्चा; टाईम्स स्क्वेअरवर झळकणार श्रीरामाची प्रतिमा

पत्र लिहल्याचे वृत्त खोटे
दरम्यान, नेपाळी नागरिकांच्या घुसखोरीवरून नेपाळच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहल्याचे वृत्त खोटे असल्याचे धारचुलाचे उपजिल्हाधिकारी अनिल कुमार शुक्ला यांनी म्हटले आहे. नेपाळच्या माध्यमांनी खोटे वृत्त पसरवल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, की मी घुसखोरीबाबत कोणत्याही प्रकारचे पत्र नेपाळच्या प्रशासनाला लिहलेले नाही. 

अमेरिकेतील मृतांची संख्या दीड लाखांहून अधिक

नेपाळचा दावा
पिथौरागडचे अनिल कुमार यांनी म्हटले की, नेपाळच्या भागातून येणाऱ्या नागरिकांमुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या घुसखोरीमागे नेपाळने माहिती द्यावी, अशी मागणी भारताने केली आहे. नेपाळने अकारण भारताच्या भूभागावर दावा केला आहे.

Edited By - Prashant Patil