esakal | नवाज शरीफ यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल!
sakal

बोलून बातमी शोधा

Nawaz_20Shariff

पाकिस्तानी सैन्याची पोलखोल करणाऱ्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवाज शरीफ यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल!

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

इस्लामाबाद- पाकिस्तानी सैन्याची पोलखोल करणाऱ्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार नवाज शरीफ यांच्याविरोधात लाहौरमध्ये खटला दाखल करण्यात आला आहे. नवाज शरीफ यांना लंडनमध्ये भडखाऊ भाषण देऊन पाकिस्तानच्या प्रतिष्ठित संस्थांविरोधात कट रचला आहे, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.  

राफेलचा पहिल्यांदाच वायुसेना दिवस परेडमध्ये समावेश; जग्वार, सुखोईही दाखवणार दम

पाकिस्तानला गुंडागर्दी करणारे राष्ट्र घोषित करणे, असा शरीफ यांच्या भाषणांचा उद्देश होता, असं एफआयआरमध्ये म्हणण्यात आलं आहे. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच नवाज शरीफ यांचे जावाई कॅप्टन (निवृत्त) मुहम्मद सफदर यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. देश आणि देशातील संस्थांविरोधात लोकांना भडकवण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

नवाज शरीफ भारताची घेत आहेत मदत- इम्रान खान

पाकिस्तानी सैन्याला कमकूवत करण्यासाठी नवाज शरीफ भारताला मदत करत आहेत. शरीफ पाकिस्तानी सैन्यावर राजनैतिक हस्तक्षेपाचा आरोप करुन एक धोकादायक खेळ खेळत आहेत, अशी टीका पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केली आहे.  पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदा सध्या लष्कर आणि सरकारमध्ये सर्वाधिक चांगले संबंध आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. 

शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना हवेत, कृषी कार्यालयालाच लागले रिक्त पदाचे ग्रहण

इम्रान खान यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना शरीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शरीफ एक धोकादायक खेळ खेळत आहेत. अल्ताफ हुसैननेही अशाच प्रकारचा खेळ खेळला होता. मला 100 टक्के विश्वास आहे की, भारतातील एक नेता नवाज शरीफ यांची मदत करत आहे. आपले लष्कर कमकूवत झाले, तर हे कोणाच्या हिताचे आहे. असे असले तरी काही लोक शरीफ यांच्या वक्तव्याशी सहमत आहेत, असं इम्रान खान म्हणाले आहेत. शरीफ भ्याड आहेत, मला त्यांच्यावर विश्वास नाही. ते भारताची मदत घेत आहेत. ते अनेक नेत्यांना भेटत आहेत, आणि आपल्या देशाविरुद्ध कट रचत आहेत, असा आरोपही इम्रान यांनी केला आहे.