उत्तर कोरियाची  संशयास्पद चाचणी 

यूएनआय
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

उत्तर कोरियात हा भूकंप आज सकाळी जाणवला. या महिन्यात सुरवातीला उत्तर कोरियात जाणवलेला भूकंप अणुचाचणीमुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

शांघाय, सोल (: संशयास्पद स्फोटामुळे उत्तर कोरियात 3.4 रिश्‍टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती चीनच्या भूकंप निरीक्षण संस्थेने शनिवारी दिली. 

उत्तर कोरियात हा भूकंप आज सकाळी जाणवला. या महिन्यात सुरवातीला उत्तर कोरियात जाणवलेला भूकंप अणुचाचणीमुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आज जाणवलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर कोरियाच्या अणुचाचणी स्थळापासून जवळच होता. दरम्यान, दक्षिण कोरियाचे हवामान खाते या भूकंपाचे स्वरूप अभ्यासत आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा नैसर्गिक भूकंप असावा, असे दक्षिण कोरियाच्या हवामान खात्याने म्हटले आहे. 

Web Title: Seismic activity detected near North Korea

टॅग्स