
Senegal: संसदेत चर्चेदरम्यान तुफान राडा, पुरूष खासदाराने महिलेच्या लगावली कानशिलात; पाहा Viral Video
बर्याच वेळा विविध देशांच्या संसदेतील वादविवाद इतका तीव्र होतो की काही वेळातच प्रचंड रौद्र रूप धारण करतो. अलीकडेच आफ्रिकन देश सेनेगलमध्ये दोन खासदारांच्या शाब्दिक चकमकीचे रुपांतर मारहाणीत झाले आणि एका पुरुष खासदाराने महिला खासदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली, तेव्हा याचा आणखी एक प्रत्यय नुकताच पाहायला मिळाला.
हेही वाचा- First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने
ही घटना सेनेगलच्या संसदेची आहे. याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. त्याचवेळी सत्ताधारी महिला खासदार अमी नादिये गनीबी आणि विरोधी पक्षाचे खासदार मसाता सांब यांच्यात जोरदार वादावादी झाली. काही धोरणांबाबत हा वाद सुरू झाला पण या चर्चेचे रूपांतर वादात झालं.
हेही वाचा: Border Dispute: शिंदे सरकारच्या मंत्र्याकडून जतमध्ये घोषणांचा पाऊस; मात्र महिलेच्या मागणीने वेधलं लक्ष
विरोधी पक्षाचे खासदार मसाता सांब यांनी पळत येवून थेट खासदार अमी नादिये गनीबी यांच्या कानाखाली चापट मारली त्यानंतर अमी नादिये गनीबी यांनी देखील मारायला सुरूवात केली. संतापलेल्या महिला खासदाराने त्यांच्यावर खुर्ची फेकली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक खासदार एकमेकांना भिडले.
एका मिडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती आणि त्यावेळी सेनेगलच्या संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. कामकाजादरम्यानच महिला खासदाराने अध्यक्षपदाच्या तिसऱ्या टर्मला विरोध करणाऱ्या नेत्यावर टीका केली, त्यानंतर गदारोळ सुरू झाला. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.