esakal | अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा टॉप लीडर ठार | US Drone Strike
sakal

बोलून बातमी शोधा

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा टॉप लीडर ठार

अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात टॉप लिडर सलीम अबू अहमद ठार झाला असल्याचं वृत्त अमरिकेच्या फॉक्स न्यूजने दिलं आहे.

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा टॉप लीडर ठार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

न्यूयॉर्क - दहशतवादी संघटना अल कायदाचा टॉप लीडर ड्रोन हल्ल्यात मारला गेला आहे. सिरियमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात टॉप लिडर सलीम अबू अहमद ठार झाला असल्याचं वृत्त अमरिकेच्या फॉक्स न्यूजने दिलं आहे. एका संरक्षण अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगण्यात आलं की, २० सप्टेंबरला अमेरिकेनं सिरियात ड्रोन हल्ला केला. यात अल कायदाचा टॉप लीडर असलेल्या सलीम अबू अहमदचा खात्मा झाला.

सिरियातील इदलिब शहरावर हल्ला करण्यात आला होता. सलीम अबू अहमद अल कायदासाठी प्लॅन तयार करणं अणि फंडिंगची व्यवस्था पाहत होता. याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रात हल्ल्यासाठी त्याची परवानगी घेतली जात असे.

अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'हवाई हल्ल्यात नागरिक मारले गेल्याची कोणतीही माहिती नाही.' अमेरिकेने याआधी अनेकदा अल कायदा आणि आयएसआयचा दहशतवादी अबू बकर अल बगदादीला टार्गेट करत इदलिबमध्ये हल्ले केले आहेत. बगदादी पूर्व सिरियातून पळून इदलिबमध्ये आला होता आणि लपून बसला होता. याठिकाणी दहशतवाद्यांमना टार्गेट करण्यासाठी अमेरिकेकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.

हेही वाचा: संतापजनक! इबोला संकटात मदतीला गेलेल्या WHO कर्मचाऱ्यांनी केले बलात्कार

गेल्या महिन्यात सिरियाची राजधानी दमिश्कमध्ये एका नैसर्गिक गॅस पाइपलाइनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामुळे शहराच्या इतर भागातील लाइट गेली होती. हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली होती. त्यांनी म्हटलं होतं की, आयएसआय़एसच्या दहशतवाद्यांनी तीशरीन आणि दीर अली प्लांटकडे जाणाऱ्या गॅस पाइपलाइनवर स्फोट केला आहे.

loading image
go to top