Parliament : संसदेत पॉर्न पाहताना खासदाराला रंगेहाथ पकडलं; सभागृहात उडाला गोंधळ

स्टेविक आपल्या मोबाईल फोनवर पॉर्नोग्राफी पाहताना संसदेच्या टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.
Serbia Socialist Party MP Zvonimir Stevic
Serbia Socialist Party MP Zvonimir Stevicesakal
Summary

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ब्रिटीश खासदार नील पॅरिश यांना सदनात त्यांच्या फोनवर दोनदा अश्लील व्हिडिओ पाहताना पकडल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

सर्बियन खासदाराचा (Serbian MP) संसदेत (Serbia Parliament) पॉर्न पाहत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ झाला. संसद टीव्ही वाहिनीच्या प्रसारणादरम्यान खासदाराची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली.

यामुळं त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. याप्रकरणी खासदाराच्या एका सहकाऱ्यानं त्यांच्यावर जोरदार टीका केली. सभागृहात एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू होती, त्यावेळी सर्बियाच्या सोशलिस्ट पार्टीचे खासदार झ्वोनिमिर स्टेविक (Zvonimir Stevic) सभागृहात पॉर्न व्हिडिओ पाहत होते.

स्टेविक आपल्या मोबाईल फोनवर पॉर्नोग्राफी पाहताना संसदेच्या टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल झाला.

Serbia Socialist Party MP Zvonimir Stevic
Hasan Mushrif : ..तर मी आमदारकीचा राजीनामा देईन; NCP च्या बड्या नेत्याचा Video शेअर करत सोमय्यांना इशारा

स्टेविक हे सर्बियन संसदेच्या 'कमिटी फॉर कोसोवो'चे अध्यक्ष होते. कोसोवोच्या विषयावर घराघरांत चर्चा सुरू होती. या गंभीर विषयावर चर्चा करत असताना स्टेविक यांना पॉर्नोग्राफी पाहताना पकडण्यात आलं. त्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

Serbia Socialist Party MP Zvonimir Stevic
'ही' निवडणूक भाजप-काँग्रेसमध्ये नाही तर, टिपू विरुध्द सावरकर यांच्यात होणार; BJP नेत्याचं वादग्रस्त विधान

या प्रकरणावर स्टेविक यांची सहकारी इविका डेसिक म्हणाली, ही एक धक्कादायक घटना आहे. 'स्टेविक, तुम्ही राजीनामा देणं योग्य आहे. आपण यापुढं या पदावर राहू शकत नाही. कारण, आपण त्यास पात्र नाही.' अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाहीये. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ब्रिटीश खासदार नील पॅरिश यांना सदनात त्यांच्या फोनवर दोनदा अश्लील व्हिडिओ पाहताना पकडल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com