..तर मी आमदारकीचा राजीनामा देईन; NCP च्या बड्या नेत्याचा Video शेअर करत सोमय्यांना इशारा I Hasan Mushrif | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Hasan Mushrif criticizes BJP leader Kirit Somaiya

काही दिवसांतच या पाठीमागील बोलवते धनी यांना आम्ही उघड केल्याशिवाय राहणार नाही.

Hasan Mushrif : ..तर मी आमदारकीचा राजीनामा देईन; NCP च्या बड्या नेत्याचा Video शेअर करत सोमय्यांना इशारा

कोल्हापूर : माझी बदनामी करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. माझ्‍याविरोधातील एकही आरोप खरा ठरला तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, असं रोखठोक मत ट्विटव्दारे व्हिडिओ शेअर करत हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्त केलं.

शेतकऱ्यांच्या मालकीच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (Kolhapur Central Cooperative Bank) बदनाम करण्याचं पाप करू नका, असंही ते म्हणाले. भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप काही दिवसांपूर्वी केले होते. हे आरोप मुश्रीफांनी वेळोवेळी फेटाळून लावले आहेत.

दोघांमध्‍ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. आज (दि. 9) मुश्रीफांनी व्हिडिओ ट्विट करत हे आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावले. मंत्री मुश्रीफांच्या बंगल्यावर काही दिवसांपूर्वी सक्‍तवसुली संचालनालय (ED) छापे टाकले होते. त्यानंतर ईडीच्या अधिकार्‍यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेवरही छापे टाकले.

'मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार'

आज मुश्रीफांनी ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, आरोप सिद्ध झाले तर मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. 40 हजार शेतकऱ्यांच्या नावावर 10 हजारप्रमाणं घेतलेले शेअर ते कारखान्याच्या उभारण्यासाठी खर्च केले असतील तर ठेव ठेवण्याची काय गरज होती. शासनाकडून एक पैशाचही अनुदान खासगी कारखान्याला मिळत नाही. याची सुद्धा सोमय्‍यांना माहिती नसावी. त्‍याचंच मला आश्चर्य वाटतंय.

'जिल्हा बॅंक आम्ही रक्त आठवून उभारलीये'

माझी बदनामी करण्यासाठी हे षडयंत्र सुरु आहे. काही दिवसांतच या पाठीमागील बोलवते धनी यांना आम्ही उघड केल्याशिवाय राहणार नाही. सातत्यानं माझ्यावर कोणतेही वैयक्तिक आरोप करु देत, पण जिल्हा मध्यवर्ती बॅंक आम्ही रक्त आठवून केली आहे. आज राज्यात सर्वत्र याचा गवगवा आहे. त्याला बदनाम करण्याचं काम ही मंडळी करत आहेत, असा आरोपीही मुश्रीफांनी केलाय.