
इटलीच्या राष्ट्रपतीपदी ८० वर्षांचे सर्जियो मातारेला यांची दुसऱ्यांदा निवड
नवी दिल्ली : सर्जियो मातारेला पहिल्यांदा २०१५ मध्ये राष्ट्रपती झाले होते. आता त्यांना दुसऱ्यांदा सात वर्षांच्या कार्यकाळासाठी पुन्हा निवडण्यात आले आहे. मातारेला यांना निवडण्यापूर्वी राष्ट्रपतीपदासाठी सात वेळेस मतदान झाले. मात्र कोणत्याही नावावर सहमती झाली नाही. इटलीचे राष्ट्रपती सर्जियो मातारेला (Sergio Matarella) यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले आहे. एकूण १ हजार ९ मतांपैकी त्यांना ७५९ मते मिळाली. ८० वर्षांचे मातारेला पुन्हा राष्ट्रपती होण्यास इच्छुक नव्हते. तसेच अनेक वेळेस पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र जेव्हा इटलीतील राजकीय पक्षांमध्ये एकाही नावावर सहमती न झाल्याने सर्जियो यांना राष्ट्रपती म्हणून निवडण्यास सहमती झाली. २०१५ मध्ये राष्ट्रपती म्हणून कार्यकाळास सुरुवात करताना मातारेला म्हणाले, माझ्या काही वेगळ्या योजना होत्या. मात्र माझी आवश्यकता आहे तर मी उपलब्ध आहे. इटलीत (Italy) राष्ट्रपतीचा कार्यकाळ सात वर्षांचा असतो. मातारेला हे आपला दुसरा कार्यकाळ पूर्ण करु शकणार नाही, असे सांगितले जाते. तरी एक आशा आहे की ते २०२३ मध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकापर्यंत थांबतील.(Sergio Matarella Reelected as President of Italy)
हेही वाचा: Maruti Alto 800 खरेदी करा २ लाखांच्या बजेटमध्ये, वाचा प्लॅन
सध्या ते राष्ट्रपती बनल्याने संवैधानिक संकट टळले आहे. संकट काळात बनलेले राष्ट्रपती मातारेला पूर्वी पंतप्रधान मारियो द्राघी यांना राष्ट्रपती बनवण्याचा विचार सुरु होता. अनेक नेत्यांना भीती होती, की द्राघी यांचा सक्रिय राजकारणातून बाहेर पडल्याने कोरोनात आर्थिक नुकसान झेलत असलेल्या इटलीला अस्थिर बनवू शकतो. द्राघी पंतप्रधान होण्यापूर्वी युरोपच्या केंद्रीय बँकेचे प्रमुख होते. जवळपास १ वर्षापूर्वी सहा पक्षांच्या आघाडीने त्यांना पंतप्रधान म्हणून निवडले होते. कर्जात बुडालेल्या इटालीला युरोपीय संघाच्या (European Union) वतीने जवळपास २०० अब्ज युरोची आर्थिक मदत मिळाली होती. या मदतीचा योग्य वापर केल्याने इटलीत द्राघीला सर्वात सक्षम व्यक्ती मानले जात होते. ते राष्ट्रपती बनले असते तर सरकार नेतृत्वहीन बनले असते. भारताप्रमाणेच इटलीत ही राष्ट्रपतीची भूमिका नामधारीच असते.(Global News)
हेही वाचा: शाळांची घंटा पुन्हा वाजली ! विद्यार्थी शिकण्यासाठी सज्ज
मातारेला यांच्या नावावर उजवे आणि डावे यांच्यासह बरेच पक्ष राजी होते. आठव्या वेळेस होणाऱ्या मतदानात उजव्या लीग पार्टीचे प्रमुख मातेयो सालविनीने मातारेलाचे नावाचा प्रस्ताव मांडला. माजी पंतप्रधान सिल्वियो बैर्लुस्कोनीचे फोर्जा आणि डावीकडे झुकलेली डेमोक्रेटिक पक्षाने प्रस्तावाचे समर्थन केले. पंतप्रधान द्राघी यांनी निवडणुकीनंतर संसदेचे इच्छेचा सन्मान करत राष्ट्रपतीपद स्वीकारल्याबद्दल मातारेला यांचे आभार मानले आहे. निवडणुकीनंतर राष्ट्रपती मातारेला यांनी एक टीव्ही संदेशात म्हटले, की माझी व्यक्तिगत इच्छा ही देशाप्रती असलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी नाही. विशेषतः जेव्हा इटली आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील समस्यांना तोंड देत आहे. आशा आहे की मातारेला बुधवारी किंवा गुरुवारपर्यंत पदभार स्वीकारतील.
Web Title: Sergio Matarella Reelected As President Of Italy
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..