अमेरिकेत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या पहिल्या कुत्र्याचा मृत्यू

अमेरिकेत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या पहिल्या कुत्र्याचा मृत्यू

मुंबईः सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलं आहे. प्रत्येक देश कोरोना व्हायरससारख्या व्हायरसचा सामना करत आहेत. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या पहिल्या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. नॅशनल जिओग्राफिक मासिकानं यासंदर्भातली माहिती दिली आहे. 

मासिकानं दिलेल्या माहितीनुसार, 'बडी' नावाचा सात वर्षांचा German shepherd एप्रिलमध्ये आजारी पडला. त्याच वेळी त्याचा मालक रॉबर्ट महोनी कोरोनामुक्त झाला होता.  बडीला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर महिन्याभरात त्याची प्रकृती आणखीन ढासळत गेली. 

महोनी आणि त्यांची पत्नी अ‍ॅलिसन हे न्यूयॉर्कमध्ये राहतात. ११ जुलैला अखेर बडीनं रक्ताच्या उलट्या केल्या तसंच  त्याच्या लघवीतून रक्तही येत होते. त्याला व्यवस्थित चालताही येत नव्हतं. पुढे कुटुंबानं नॅशनल जिओग्राफिकला सांगितले की, बडीला एसएआरएस-सीओव्ही -2 ची लागण झाली आहे की या संशयाची पुष्टी करण्यास त्यांना खूपच कठीण गेलं.

कोणतीही शंका न घेता, मला वाटले की (बडी) सकारात्मक आहे, असं महोनी म्हणाले. मात्र कोरोना व्हायरसमुळे आमच्या भागातील अनेक पशुवैद्यकीय दवाखानं बंद होते. कुत्र्यांमधील कोविडच्या वैज्ञानिक आधारावर आम्हाला शून्य ज्ञान किंवा अनुभव होता,  बडीची चाचणी घेणाऱ्या पशु रॉबर्ट कोहेन यांनी मासिकाला सांगितले.

सार्वजनिक आरोग्य अधिकारी किंवा पशुवैद्य कोणीही कुटूंबियांना जास्त माहिती देऊ शकले नाहीत. त्यांनी नॅशनल जिओग्राफिकला सांगितलं, प्राण्यांमध्ये व्हायरसचा पुरेसा डेटा नव्हता. त्यांच्यामध्ये संसर्ग फारच कमी असल्याचं दिसून आलंय.

नॅशनल जिओग्राफीकच्या म्हणण्यानुसार, १२ कुत्रे आणि 10 मांजरींनी अमेरिकेत कोरोना व्हायरसची लागण झाली.

seven year old coronavirus positive German shepherd dog died United States

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com