शरीफ अमेरिकेला जाणे शक्‍य

पीटीआय
सोमवार, 5 डिसेंबर 2016

इस्लामाबाद - अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुढील महिन्यात शपथविधी होणार असून, यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हजर राहण्याची शक्‍यता येथील माध्यमांनी व्यक्त केली आहे. शरीफ आणि ट्रम्प यांच्यात तीन दिवसांपूर्वी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेवरून हा अंदाज बांधण्यात आला आहे. परराष्ट्र धोरणाबाबतचे शरीफ यांचे विशेष सहकारी तारीक फातेमी हे या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी अमेरिकेला लवकरच जाणार असल्याचेही सांगण्यात येते. फातेमी या वेळी ट्रम्प यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्याबाबत चर्चा करतील.

इस्लामाबाद - अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुढील महिन्यात शपथविधी होणार असून, यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हजर राहण्याची शक्‍यता येथील माध्यमांनी व्यक्त केली आहे. शरीफ आणि ट्रम्प यांच्यात तीन दिवसांपूर्वी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेवरून हा अंदाज बांधण्यात आला आहे. परराष्ट्र धोरणाबाबतचे शरीफ यांचे विशेष सहकारी तारीक फातेमी हे या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी अमेरिकेला लवकरच जाणार असल्याचेही सांगण्यात येते. फातेमी या वेळी ट्रम्प यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्याबाबत चर्चा करतील. तसेच दहशतवादाबाबत पाकिस्तानचे धोरण आणि भारत, अफगाणिस्तानबरोबरील संबंध याबाबतही ते चर्चा करणे अपेक्षित आहे.

Web Title: Sharif could go to the US