

शेख हसीना बांगलादेशात परतणार? नव्या पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्रासाठी दिल्लीतील दूतावासाकडे अर्ज
esakal
Sheikh Hasina return to Bangladesh: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या मायदेशी परतण्याच्या तयारीत आहेत. डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याची योजना आखत असलेल्या हसीना यांनी नवीन पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्रासाठी (NID) दिल्लीतील बांगलादेश दूतावासाकडे अर्ज केला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये सत्तेतून पायउतार होऊन भारतात आश्रय घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे अधिकृत संपर्क साधला आहे.