
शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान होणार UAE चे नवीन अध्यक्ष
दुबई : संयुक्त अरब अमीरातचे (UAE) अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान (Sheikh Halifa Bin Zayed Al Nahyan) यांचे काल निधन झाले. त्यानंतर आज UAE च्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान (वय 61) हे UAE चे पुढील अध्यक्ष असतील. असे वृत्त खलीज टाईम्सने दिले आहे. (Sheikh Mohamed Bin Zayed Al Nahyan Next President Of UAE)
संयुक्त अरब अमीरातचे (UAE) अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान (heikh Halifa Bin Zayed Al Nahyan) यांचे काल निधन झाले. नाहयान हे 73 वर्षांचे होते. नाहायन यांच्या निधनाबद्दल सरकारने 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. याशिवाय देशातील सर्व खासगी आणि सरकारी क्षेत्रात तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (UAE President Sheikh Halifa Bin Zayed Al Nahyan Passes Away)
हेही वाचा: एक देश, एक भाषेचे आव्हान अमित शहांनी स्वीकारावे : राऊत
शेख खलिफा बिन झायेद अल नाहायान यांनी 3 नोव्हेंबर 2004 पासून देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक म्हणून पदभार स्वीकारला. त्याआधी त्यांचे वडील शेख झायेद बिन सुलतान अल नाहयान राष्ट्राध्यक्ष होते. 1971 ते नोव्हेंबर 2004 पर्यंत ते देशाचे प्रमुख होते. 1948 मध्ये जन्मलेले शेख खलिफा हे UAE चे दुसरे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे 16 वे शासक होते. आपल्या कार्यकाळात, शेख खलिफा यांनी UAE आणि अबूधाबीच्या प्रशासनाची पुनर्रचना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि अनेक सुधारणा अंमलात आणल्या.
Web Title: Sheikh Mohamed Bin Zayed Al Nahyan Will Be The Next President Of The Uae
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..