
एक देश, एक भाषेचे आव्हान अमित शहांनी स्वीकारावे : राऊत
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशात हिंदी भाषेवरुन (Hindi Language Controversy ) मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. त्यात काल तामिळनाडूच्या शिक्षण मंत्र्यांनी हिंदी भाषेबद्दल वादग्रस्त विधाने केले होते. त्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच आता या वादामध्ये शिवसेनेचे सासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडी घेतली असून, राऊतांनी थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना आव्हान दिले आहे. शहांनी एक देश, एक संविधान आणि एक भाषा हे सूत्र लागू करण्याचे आव्हान स्विकारले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तामिळनाडूचे शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी हिंदी भाषेबाबत वादग्रस्त विधान करत हिंदी भाषा ही पाणीपुरीवाल्यांची भाषा आहे, असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी महत्वाचं विधान केले आहे. (Sanjay Raut On one country one language )
हेही वाचा: हिंदी भाषा वादात सोनू निगमची उडी; म्हणाला,'भारताच्या समस्या वाढवू नका'
राऊत म्हणाले की, संपूर्ण भारतात हिंदी भाषा बोलली जाते. तसेच ती देशभरात स्वीकारला जाते. त्यासाठी सर्व राज्यांची एकच भाषा असली पाहिजे. त्यासाठी देशात एकच भाषा लागू करण्याचे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वीकारावे. अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर महिनाभरानंतर राऊत यांचे वक्तव्य आले आहे. याआधी शहा म्हणाले होते की, इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदीचा स्वीकार केला पाहिजे, न की स्थानिक भाषा. त्यानंतर आता राऊतांनी 'एक देश, एक भाषा' हे सूत्र लागू करण्याबाबतचे आव्हान शहांनी स्विकारावे असे म्हटले आहे.
हेही वाचा: औरंगजेबाशेजारी तुम्हालाही गाडू : संजय राऊत
संसदेत मी हिंदीतच बोलतो
राऊत पुढे बोलताना म्हणाले की "मी आणि माझा पक्ष हिंदी भाषेचा सन्मान करतो. संसदेत मी हिंदीतच बोलतो. कारण देशाने माझे म्हणणे ऐकावे. हिंदी ही देशाची भाषा आहे. त्यामुळे या भाषेचा सन्मान व्हावा. एक देश, एक संविधान आणि एक भाषेचे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वीकारले पाहिजे, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
शिवसेनेने नेहमीच हिंदीचा आदर केला
तामिळनाडूच्या मंत्र्यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता राऊत म्हणाले की, शिवसेनेने (Shivsena) नेहमीच हिंदीचा आदर केला आहे. मला जेव्हा जेव्हा सभागृहात संधी मिळते तेव्हा मी हिंदीत बोलतो, कारण मला जे म्हणायचे आहे ते देशाने ऐकले पाहिजे, ही देशाची भाषा आहे. हिंदी ही एकमेव भाषा आहे जी संपूर्ण देशात स्वीकारली जाते आणि बोलली जाते. बॉलीवूडच्या हिंदी चित्रपटांचा देशात आणि जगात प्रभाव आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळे कोणत्याही भाषेचा अपमान होता कामा नये.
Web Title: Amit Shah Should Accept The Challenge Of One Country One Language Says Sanjay Raut
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..