बाप-लेकीच्या मृतदेहाचा 'हा' फोटो पाहून येतील डोळ्यात अश्रू!

USA
USA

न्यूयॉर्क : समुद्र किनाऱ्यावर निपचीत पडलेला ऍलेन कुर्दी या सीरियातील चिमुकल्याचा मृतदेह आठवून अजूनही मन हेलावते, पण आता अमेरिकेतील नदी किनारी बाप-लेकीच्या मृतदेहाचा फोटो पाहून डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.

2015 मध्ये सीरियातील एलेन कुर्दी या मुलाचा मृतदेह समुद्रालगत सापडल्यानंतर जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अमेरिकेचा शेजारील देश अल सेल्व्हाडोरमधील निर्वासित असलेल्या एक चिमुकली व तिच्या वडिलांचा मृतदेह नदी किनारी सापडला. 

मध्य अमेरिकेच्या जवळ असलेल्या अल सेल्व्हाडोर या देशातील ऑस्कर एलबोर्तो मारटिनेज आणि त्यांची मुलगी वलेरिया यांचा मृतदेह नदी किनारी सापडला आहे. हा फोटो मेक्सिकोच्या एका वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर जगभरात खळबळ उडाली. अमेरिका व मेक्सिको बॉर्डरवर सध्या वाद सुरू असून या वादामुळे अल सेल्वाडोअरमधील अनेक नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. अनेक नागरिक अमेरिकेकडे शरण देण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे रॅमिरेज हा गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी प्रयत्न करत होते. रॅमिरेज याची शरण देण्याची मागणी पूर्ण होत नसल्याने तो त्याची पत्नी व त्याची लेक एका बोटीने नदी पार करून अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांची बोट नदीत उलटल्याने रॅमिरेज व त्याच्या लेकीचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी या दुर्घटनेतून बचावली. हा फोटो समोर आल्यानंतर अमेरिकेतील ट्रम्प सरकारच्या निर्वासितांविरोधातील धोरणांवरून टीका होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com