VIDEO : अजगराने गिळली महाकाय मगर; व्हिडीओ पाहून उडेल थरकाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

python

VIDEO : अजगराने गिळली महाकाय मगर; व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

मुंबई - अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये बर्मीज अजगराच्या पोटात एक महाकाय मगर आढळून आली आहे. मध्यंतरावरील त्रासदायक फुटेजमधून ही बाब उघड झाली आहे. 'न्यूजवीक'ने दिलेल्या माहितीनुसार, 18 फुटी अजगराला नॅशनल पार्कच्या कर्मचाऱ्यांनी पकडले होते. मात्र काही वेळातच अजगराचा मृत्यू झाला. shocking video of 5 foot alligator found inside burmese python

हेही वाचा: Bharat Jodo:...हाच गांधीजी अन् सावरकर यांच्यात फरक; राहुल गांधींची संघावर जोरदार टीका

दरम्यान कर्मचाऱ्यांनी विचित्र फुगलेल्या अजगराच्या आतील भागाची तपासणी केली. तेव्हा त्याच्या पोटात 5 फुटांची महाकाय मगर आढळून आली. या भागात बर्मीज अजगरांची सुळसुळाट असतो. ऑगस्ट 2022 मध्ये फ्लोरिडा येथे पायथन चॅलेंज आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर शेकडो अजगरांना या भागातून बाहेर काढण्यात आले होते.

हेही वाचा: Missing Link Project: आशियातील सर्वात लांब बोगद्याचे ५५ टक्के काम पूर्ण; CM शिंदेकडून पाहणी

असगराचे फोटो भूवैज्ञानिक रोझी मूर यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे. गेल्या मंगळवारी हे फुटेज इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले होते. या व्हिडीओला १० दहा लाखाहून लोकांनी पाहिलं आहे. व्हिडीओमध्ये अजगराचे चिरफाड करून तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोटातील मृत मगर बाहेर काढण्यात आली.

टॅग्स :snakevideo viral