व्हिएतनाममध्ये तीन महिन्यांनंतर पुन्हा संसर्ग; दुसरी लाट येण्याची चिन्हे

वृत्तसंस्था
Wednesday, 2 December 2020

विविध देशांत कोरोनाची दुसरी लाट आली असताना व्हिएतनाममध्ये तीन महिन्यांनंतर स्थानिक संक्रमणाचा एक रुग्ण पुन्हा आढळला आहे. पहिल्या लाटेत ज्या देशांना कोरोनाला रोखण्यास यश आले त्यामध्ये व्हिएतनामही होता. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी या देशाचे उदाहरण दिले जाते. आता तेथेही संसर्गाची दुसरी लाट येण्याची चिन्हे आहेत.

वॉशिंग्टन - विविध देशांत कोरोनाची दुसरी लाट आली असताना व्हिएतनाममध्ये तीन महिन्यांनंतर स्थानिक संक्रमणाचा एक रुग्ण पुन्हा आढळला आहे. पहिल्या लाटेत ज्या देशांना कोरोनाला रोखण्यास यश आले त्यामध्ये व्हिएतनामही होता. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी या देशाचे उदाहरण दिले जाते. आता तेथेही संसर्गाची दुसरी लाट येण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

व्हिएतनाममध्ये तीन महिन्यांनंतर स्थानिक संक्रमणाचा एक रुग्ण आढळला असल्याची माहिती तेथील आरोग्य मंत्रालयाने दिली. सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले हो चि मिन्ह या शहरातील हा रुग्ण आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे सुरू केले आहे. विलगीकरण कक्षही नव्याने सज्ज ठेवण्यात आले आहेत. 

२६/११ हल्ल्यातील कामगिरीबद्दल सर्वोच्च पदक द्या; तहव्वूर राणाची पाकिस्तानकडे मागणी 

ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण गेला होता, तेथे लॉकडाउन जाहीर केले आहे. कोरोनाची साथ पसरल्यानंतर व्हिएतनाममध्ये साधारण एक हजार ३४७ रुग्ण आढळले असून ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. 

अमेरिकेला मिळू शकतो दिलासा
अमेरिकेत नाताळापूर्वी लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्री ॲलेक्स अजार यांनी सोमवारी (ता. ३०) सांगितले की, फायझर कंपनीच्या लसीला लवकरच मंजुरी मिळू शकते. यासंबंधी आरोग्य विभाग आणि अन्न व प्रशासन विभागाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. 

चीनने निभावली मैत्री! किम जोंग उनला दिली कोरोना लस

जगात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या  साडेसहा कोटींपेक्षा पुढे गेली आहे. सुमारे चार कोटी ३९ लाख रुग्ण बरे झाले आहेत तर आतापर्यंत आता १४ लाख ७३ हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या एक कोटी ३९ लाखापेक्षा जास्त असून मृतांची संख्या दोन लाख ७४ हजार आहे.

कोलंबिया सीमा बंदच राहणार
कोलंबियात संसर्गाचा धोका कमी झालेला नसल्याने देशाच्या सीमा १६ जानेवारीपर्यंत खुल्या न करण्याचा निर्णय तेथील सरकारने काल घेतला. ‘‘देशात जे कडक निर्बंध लागू केले आहेत, त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहे. त्यामुळे आमचे प्रयत्न फोल ठरू नये यासाठी सीमा खुल्या करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे,’’ असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Signs second Corona wave of reinfection Vietnam three months