मुस्लिम असल्याच्या समजुतीतून शीख युवकाचा अपमान

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

बोस्टन : येथील प्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात शिकत असलेल्या शीख युवकाचा, तो मुस्लिम असल्याची समजूत झाल्याने एका व्यक्तीने अपपान केला. हरमनसिंग (वय 22) असे या युवकाचे नाव असून, तो मॅसेच्युसेट्‌स येथे एका मॉलमध्ये खरेदीसाठी गेला असताना ही घटना घडली.

हरमनसिंग खरेदी करता करताच आपल्या आईशी मोबाईलवरून बोलत असताना एक माणूस त्याच्याजवळ आला आणि मोठ्याने," हे पाहा, मुस्लिम' असे म्हणून त्याच्याकडे रागाने पाहू लागला. त्याच्याकडे दुर्लक्ष करत हरमनने आईशी बोलणे आणि खरेदी करणे सुरूच ठेवले तरी हा माणूस त्याच्या मागेमागेच जात त्याला, "तू कोण आहेस, कोठून आलास,' असे प्रश्‍न विचारत त्रास देऊ लागला. यामुळे आपल्याला स्वत:च्या सुरक्षेबाबत भीती वाटल्याचे आणि अशाच प्रकारे अपमान आणि प्रसंगी मारहाण होत असलेल्या इतर शीख बांधवांबद्दल काळजी वाटत असल्याचे हरमनने येथील एका वृत्तपत्रात लिहिलेल्या अनुभवात सांगितले. विशेष म्हणजे, संबंधित माणूस हरमनला त्रास देत असताना इतर कोणीही यात हस्तक्षेप केला नाही.

Web Title: sikh youth looking like muslim insulted