सिंगापूरचे पंतप्रधान म्हणतात, नेहरूंच्या भारतातील निम्म्या खासदारांवर खटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंगापूरचे पंतप्रधान म्हणतात, नेहरूंच्या भारतातील निम्म्या खासदारांवर खटले

सिंगापूरचे पंतप्रधान म्हणतात, नेहरूंच्या भारतातील निम्म्या खासदारांवर खटले

नवी दिल्ली : सिंगापूरचे पंतप्रधान ली हेइन लूंग यांनी सिंगापूर संसदेत बोलताना भारतातील खासदारांबाबत व्यक्तव्य केल्यानंतर केंद्र सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने या विधानाला आक्षेप घेत सिंगापूरच्या राजदुतास पाचारण केले. (Singapore prime ministe)

हेही वाचा: 'पुतीन यांना फोन करणार नाही'; युक्रेनवरील हल्ल्याबाबत रशिया-अमेरिकेत बाचाबाची

सिंगापूरच्या संसदेत काल चर्चेदरम्यान पंतप्रधान लूंग यांनी भारताच्या संसदेत गुन्हेगारी प्रवृत्तींच्या खासदारांबाबत मत मांडले. ते म्हणाले, की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भारतातील संसदेत जवळपास निम्म्या खासदारांवर गुन्हेगारीचे खटले प्रलंबित आहेत. यात बलात्कार आणि खूनाचा समावेश आहे. परंतु यापैकी बहुतांश प्रकरणे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले जाते. लूंग यांनी हा संदर्भ मांडताना स्थानिक माध्यमांचा हवाला दिला. एका अर्थाने भारतात लोकशाही परंपरा, नीतिमूल्य आणि आदर्शाचा ऱ्हास होत असल्याचे लूंग यांना सांगायचे होते.

हेही वाचा: कोरोना म्हणजे 133 वर्षांनंतर परतलेला 'रशियन फ्लू'?

लूंग यांनी आपल्या भाषणात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक नेत्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, सुरवात ही खूपच ध्येयाने आणि भावनिकतेने होते. स्वातंत्र्यासाठी लढलेले नेते महान होते. त्यांच्यात साहस आणि निष्ठा होती. यात डेव्हिड बेन गुरिओन्स, जवाहरलाल नेहरू यांचा समावेश करता येईल. ते तावून सुलाखून उजळून निघाले. आपल्याकडे देखील असे नेते होते. दरम्यान, पंतप्रधान लूंग यांच्या वक्तव्यानंतर भारताने सिंगापूरच्या राजदूतास पाचारण केले आणि लूंग यांच्या वक्तव्याबाबत नाराजी नोंदवली.

Web Title: Singapore Prime Minister Says Jawaharlal Nehru Lawsuits Against Half Of India Mp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..