Pritam Singh: भारतीय वंशाच्या खासदारावर खोटे बोलल्याचा आरोप, सिद्ध झाल्यास...

Singapore Parliament: सध्या सिंगापुरच्या संसदेवर पिपल्स अ‍ॅक्शन पार्टीचे वर्चस्व आहे. अ‍ॅक्शन पार्टी 1959 पासून सतत सत्तेत आहे.
Leader of the Opposition of Singapore
Leader of the Opposition of SingaporeEsakal

Pritam Singh Leader of the Opposition of Singapore:

सिंगापूरमधील विरोधी पक्षनेते प्रीतम सिंग यांच्यावर मंगळवारी संसदीय समितीसमोर खोटे बोलल्याचा आरोप करण्यात आला आहे. वर्कर्स पार्टीचे सरचिटणीस प्रीतम हे मूळचे भारतीय आहेत.

माजी खासदार रईसा खान यांच्याशी संबंधित विशेषाधिकार समितीच्या सुनावणीदरम्यान खोटी साक्ष दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

या सर्व प्रकारामुळे प्रीतम सिंग आता गोत्यात आले आहेत. संसदेच्या कायद्यानुसार आपण निर्दोश असल्याचे खासदार प्रीतम म्हणत आहेत.

या प्रकरणात दोषी आढळल्यास, विरोधी पक्षाच्या नेत्याला प्रत्येक आरोपासाठी तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा 7,000 सिंगापूर डॉलर्सपर्यंत दंड होऊ शकतो.

दरम्यान, स्वत:साठी वकील नेमण्यासाठी त्यांनी चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे. या प्रकरणी 17 एप्रिलला प्री-ट्रायल कॉन्फरन्स होणार आहे.

Leader of the Opposition of Singapore
"CAA मुळे मुस्लिमांवर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता वाटते," अमेरिकन खासदाराचे वक्तव्य; हिंदू संघटनांनी फटकारले

प्रीतम सिंग यांच्या वर्तनाचा अहवाल संसदेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आला होता. अनेक सुनावणींनंतर समितीने प्रीतम सिंग यांना पुढील तपासासाठी सरकारी अभियोगाकडे पाठवण्याची शिफारस केली.

विशेषाधिकार समितीच्या अंतिम अहवालातील विशेष बाब म्हणजे शपथ घेतल्यानंतर साक्ष देताना प्रीतम सिंह खोटे बोलले होते.

Leader of the Opposition of Singapore
China India Border Issues : चीनच्या उदयाचे देशासमोरआव्हान : सरसेनाध्यक्ष

सध्या सिंगापुरच्या संसदेवर पिपल्स अ‍ॅक्शन पार्टीचे वर्चस्व आहे. अ‍ॅक्शन पार्टी 1959 पासून सतत सत्तेत आहे.

2020 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अ‍ॅक्शन पार्टीने 83 जागा जिंकत पुन्हा सत्ता मिळवली होती. तर सर्वात मोठी विरोधी पार्टी म्हणून वर्कर्स पार्टी उदयास आली होती. त्यांनी 10 जागा जिंकल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com