
युगांडाच्या प्रसिद्ध गायकाला व्हायचयं मुस्लिम; कारण वाचून बसेल धक्का
जगात अनेक धर्म आहेत. प्रत्येक धर्माचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे एकमेकांच्या धर्माविषयी जवळून माहिती मिळत असते. सर्व धर्मात अनेक गोष्टी समान असल्या तरी प्रत्येक धर्माची स्वतःची वेगळी ओळख आहे. प्रत्येक धर्मात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा इतर धर्माच्या लोकांवर परिणाम होतो. यामुळे बऱ्याच वेळा लोकं धर्मांतर करतात. असाच एक प्रकार युगांडातून (Uganda) समोर आला आहे. धर्मांतराचे कारण ऐकून कोणालाही आर्श्चय होईल, असे आहे...
अनेक लोक आपला धर्म बदलत असतात. कोणत्या धर्माविषयी आकर्षित होऊन तर कोणी पैशांसाठी धर्मपरिवर्तन करीत असतात. मात्र, युगांडाचा (Uganda) प्रसिद्ध गायक वायक्लिफ तुगुमे ऊर्फ याकी बेंडा यानेही धर्मांतराबद्दल अलीकडेच भाष्य केले आहे. धर्मपरिवर्तनासाठी त्याने दिलेले कारण खूपच वेगळे आहे. त्याने इस्लामचा (Convert to Islam) स्वीकार करण्याचे दिलेले कारण खूपच आश्चर्यकारक आहे.
हेही वाचा: वर्गात घुसून विद्यार्थिनीचे कपडे काढले; विद्यार्थ्यांसमोर केली लघवी
मला इस्लाम धर्म आवडतो. कारण, त्यात अनेक खास गोष्टी आहेत. जसे की तुम्ही चार महिलांशीही लग्न करू शकता, असे याकी म्हणाला. नुकत्याच झालेल्या ईदच्या वेळी मुस्लिमांना (Convert to Islam) भोजन देताना याकीने आपला हेतू सांगितला. इस्लामिक विवाहांमध्ये सर्व बायका भांडण न करता एकत्र कसे राहतात हे पाहून मला आनंद होतो. हे क्वचितच कोणत्याही धर्मात घडते, असेही तो म्हणाला.
याकी हा एका मुलाचा बाप आहे. त्याचे महिलांसोबतचे संबंध सतत बिघडत असते. यामुळेच तो इस्लाम धर्म स्वीकारण्याचा विचार करीत आहे. याकीशिवाय इतरही अनेक कलाकार आहेत ज्यांनी धर्म बदलून इस्लाम स्वीकारला आहे. याकीने केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. रासायनिक अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यानंतर याकीने कधीही कोणत्याही कार्यालयात काम केले नाही. याशिवाय त्याने संगीतकार बनून आपले स्वप्न पूर्ण केले. म्हणून स्वप्न पूर्ण केले आणि तेच त्यांचे करिअर केले.
Web Title: Singer Wycliffe Tugume Aka Yaki Benda Uganda Convert To Islam
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..