Video: सहा महिन्यांच्या मुलाने केला विश्व विक्रम!

वृत्तसंस्था
Tuesday, 22 September 2020

अमेरिकेतील उटाहमधील सहा महिन्यांच्या चिमुकल्याने विश्व विक्रम केला आहे. कमी वयातील वॉटर स्किइंग करणारा हा चिमुकल ठरला आहे. वॉटर स्किइंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

न्यूयॉर्क: अमेरिकेतील उटाहमधील सहा महिन्यांच्या चिमुकल्याने विश्व विक्रम केला आहे. कमी वयातील वॉटर स्किइंग करणारा हा चिमुकल ठरला आहे. वॉटर स्किइंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: मृत मुलाच्या ह्रदयाचे ठोके ऐकून फुटला भावनांचा बांध

सहा महिन्याच्या चिमुकल्याने लेक पॉवेलमध्ये वॉटर स्कीइंग करताना दाखवत आहे. रिच हम्फ्रीज असे चिमुकल्याचे नाव आहे. केसी आणि मिंडी हम्फ्रिज असे त्याच्या आई-वडिलांचे नाव आहे. त्यांनी मुलाच्या नावाने खाते उघडून छायाचित्र आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, चिमुकल्याने बोटीशी जोडेलेल्या एका रॉडला घट्ट पकडले आहे. त्याला लाईफ जॅकेट घातलेले दिसून, सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतलेली दिसत आहे. शिवाय, दुसऱया बाजुला त्याचे आई-वडील दिसत आहेत. या व्हिडिओला शीर्षक देण्यात आले आहे की, 'मी माझ्या सहाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं वॉटर स्किइंग करण्यासाठी गेलो होतो. हे खूपच मोठं आणि कठीण काम असून मी वर्ल्ड रिकॉर्ड केला आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I went water skiing for my 6 month birthday. Apparently that’s a big deal… #worldrecord

A post shared by Rich Casey Humpherys (@richcaseyhumpherys) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six month old baby water skiing broken world record video viral