त्वचेसाठी वापरा टाल्कम पावडर आणि जेली

Talcum-Powder
Talcum-Powder
Updated on

लंडन - कोरोनाविरोधातील लढाईत आरोग्यसेवक सर्वाधिक आघाडीवर आहेत. इतरांबरोबर स्वतःचीही काळजी घेण्यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य सेवकांना सातत्याने मास्क, पीपीई किट घालूनच फिरावे लागते. मात्र त्यामुळे त्यांच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. या लोकांनी पेट्रोलियम जेली आणि टाल्कम पावडरसारख्या पदार्थांचा वापर केल्यास त्वचेचे संरक्षण होऊ शकते, असा दावा काही संशोधकांनी केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लंडनमधील इंपीरियल महाविद्यालयातील संशोधकांनी हा अभ्यास केला असून याबाबतचा अहवाल प्लॉस वन या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. कोरोनाकाळात पीपीई किट, मास्क, हातमोजे, गॉगल यांचा वापर करणे हा आरोग्य सेवकांच्या दिनचर्येचा भाग झाला आहे. विषाणूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांना हा वापर आवश्यक असला तरी या वस्तूंच्या त्वचेबरोबर होणाऱ्या सततच्या घर्षणामुळे त्वचेचे नुकसान होते. त्वचा फाटणे, पुरळ येणे , खाज सुटणे असा त्रास होऊ शकतो. यामुळे आरोग्य सेवकांना पावडर किंवा जेली वापरण्याचा सल्ला दिला जातो.  

बाजारात मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या जेली अथवा पावडर या त्वचेवर चिकचिक न दिसण्यासाठी त्वचेत शोषली जाईल, आशा पद्धतीने तयार केल्या असतात. मात्र, इतरांसाठी हे उपयुक्त ठरत असणे शक्य असले तरी याचा पीपीई किट वापरणाऱ्यांना उपयोग नाही. त्वचेमध्ये शोषले न जाता त्वचा आणि पीपीई किट यांच्यामध्ये दीर्घकाळ थर तयार करतात, ती पावडर किंवा जेली उत्तम समजावी, असे या अहवालात म्हटले आहे.

काही निष्कर्ष

  • सर्वसाधारण पावडर अथवा जेली त्वचेवर लावताच काही काळ घर्षणाचे प्रमाण कमी असते, मात्र १०-१५ मिनिटांत प्रभाव कमी होतो
  • जे पदार्थ सहज त्वचेत मिसळत नाहीत, ते उपयुक्त
  • पीपीई किट सातत्याने वापरणाऱ्यांनी त्वचेची काळजी घेणे अत्यावश्यक

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com