
हसताय ना ? हसायलाच पाहिजे,सरकारी कंपनीचं नवं धोरण ..
आयुष्य जगताना हसत-खेळत आयुष्य जगले पाहिजे, असे खूपदा सांगितले जाते. मग तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा घरात. तुम्ही हसले पाहिजेच. मात्र, त्यावर अजून पर्यंत कुठला कायदा झालेला नव्हता.आता मात्र यावर नुकताच एक कायदा पारित करण्यात आला आहे. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Employees) कार्यालयात हसण्याचे (Smile) आदेश देण्यात आले आहेत.
यासोबतच या कायद्यात हे पण सांगितले आहे की, कर्मचारी जर हसले नाही तर त्यांच्यांकडून दंड आकारण्यात येणार आहे. वास्तविक हा आदेश स्थानिक पातळीवर फिलिपाइन्सच्या (Philippines) महापौरांनी काढला आहे. या कायद्यात असे सांगितले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात हसतहसत काम करावे लागणार आहे. तसे न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दंड होऊ शकतो
हेही वाचा: हसणे हा सामूहिक व्यायामाचा प्रकार - डॉ. श्रुतिका कोतकुंडे
6 महिन्यांचा पगार कापला जाऊ शकतो...
या कायद्याचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा 6 महिन्यांचा पगार कापला जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्टपणे कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. आणि या कायद्याची पुढची पायरी म्हणजे कर्मचाऱ्यांना नोकरीतून निलंबितही केले जाऊ शकते.
न्यू स्ट्रेट टाईम्सच्या (New Straits Times) वृत्तानुसार,
महापौर अरिस्टॉटल अगुरी यांनी काढलेल्या या कायद्याचे नाव स्माईल पॉलिसी (Smile Policy) असे आहे. ज्या कायद्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना हसत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.महापौरांना स्थानिक शासन स्तरावर सेवा सुधारायच्या आहेत.
जेव्हा लोक आपल्या कामासाठी कार्यालयात येतात तेव्हा त्यांना आनंदाचे वातावरण मिळावे, अशी महापौरांची प्रामाणिक इच्छा आहे.महापौर एरिस्टोटल अगूरी यांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनात बदल घडवायचा आहे. त्यांनी लोकांच्या स्थानिक पातळीवर येणाऱ्या तक्रारी पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. अरिस्टॉटल अगुरी यांनी या महिन्यात लुझोन (Luzon) बेटाच्या क्वेझॉन प्रांतातील मूलॉने शहरात पदभार स्वीकारला आहे. काही दिवसांतच त्यांनी स्माईल पॉलिसी आणली आहे.
Web Title: Smile Policy Government Scheme To Smile Luzon Philippines
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..