हाडांमध्ये लपलाय ओमिक्रॉनला हरवण्याचा उपाय!

डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन अधिक धोकादायक नसल्याचे आतापर्यंत बोलले जात आहे.
Omicron
Omicronsakal media

संपूर्ण जग सध्या दक्षिण आफ्रिकेतून (South Africa Variant) पसरलेल्या कोरोना विषाणू ओमिक्रॉन व्हेरिएंटशी (Omicron Variant) झुंज देत आहे. तथापि, डेल्टा (Delta) व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉन विषाणू अधिक धोकादायक नसल्याचे आतापर्यंत बोलले जात आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत आता ओमिक्रॉनचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात नोंदवली जात असून, ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण डिसेंबरमध्ये नोंदवण्यात आला होता. त्यानंतर एका महिन्यानंतर दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. (Solution To Defeat omicron Hidden In Bones)

Omicron
Omicron बाबत आरोग्य मंत्रालयाकडून रणनीतीत बदल

दक्षिण आफ्रिकेने या विषाणूचा पराभव कसा केला?

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन विद्यापीठाने (CapeTown University) केलेल्या संशोधनातून (Research) असे समोर आले आहे की, दक्षिण आफ्रिकेने हाडांमध्ये (बोन मॅरो) लपलेल्या विशेष पेशी 'टी पेशी' (T-cells) ने ओमिक्रॉनचा पराभव केला आहे. आफ्रिकेतील गौतेंग प्रांतात ओमिक्रॉनवर हे संशोधन (Research on Omicron) करण्यात आले. गौतेंग प्रांतातच पहिल्या ओमिक्रॉन रूग्णाची नोंद करण्यात आली होती. (How South Africa Defeat with omicron Variant)

Omicron
तात्काळ बाजू मांडा; महेश मांजरेकरांना राज्य महिला आयोगाची नोटीस

हाडांमधील लपलेल्या पेशींचे योगदान

हाडांमध्ये (बोन मॅरो) लपलेल्या पेशी (टी पेशी) ओमिक्रॉनला (Omicron) पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मानवी शरीरात दोन प्रकारच्या (Two Cells In Human Body) पेशी असतात. पहिली पांढरी तर दुसरी रक्तपेशी. हे मानवी शरीरात होणारा कोणताही विषाणूला शोधून त्याला नष्ट करण्याचे काम करते. असे मानले जाते की, बी पेशी शरीरातील रोगाची लक्षणे ओळखण्यास सक्षम असतात. त्याच वेळी, टी पेशी रोगाच्या विषाणूशी लढण्याचे काम करतात.

लसीकरणावर अधिक लक्ष

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची लस घेतलेल्या किंवा संसर्ग झालेल्या 70-80 टक्के रुग्णांना टी पेशींविरूद्ध उत्तम प्रतिसाद दिला आहे. टी सेल तुम्हाला संसर्ग होण्यापासून प्रतिबंधित करते, परंतु संसर्ग झाल्यानंतर व्हायरस शरीरात पोहोचताच तो नष्ट करण्याचे काम केले जाते. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांनी टी पेशी बळकट करण्यासाठी, लसीकरणाला गती देऊन ओमिक्रॉनचा पराभव केला आहे. त्यामुळे भारतही दक्षिण आफ्रिकेच्या या पद्धतीतून शिकू शकतो आणि कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूवर मात करू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com