esakal | कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत ब्रिटनचे दावे खोटे; आफ्रिकेच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

कोरोनाचा धोका काही देशांमध्ये कमी होत असतानाच नवी स्ट्रेन सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या स्ट्रेनमुळे जगातील अनेक देशांनी ब्रिटनला ये-जा करणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत ब्रिटनचे दावे खोटे; आफ्रिकेच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जोहान्सबर्ग - कोरोनाचा धोका काही देशांमध्ये कमी होत असतानाच नवी स्ट्रेन सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या स्ट्रेनमुळे जगातील अनेक देशांनी ब्रिटनला ये-जा करणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. दरम्यान, आता दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य मंत्रालयाने ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांचा दावा फेटाळून लावला आहे. दक्षिण आफ्रिकेतमध्ये कोरोनाची नवी स्ट्रेन असून ब्रिटनमधील स्ट्रेनपेक्षाही धोकादायक आहे असा दावा ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांनी केला होता. 

दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री जेल्विनी मखिजे यांनी गुरुवारी रात्री उशिरा सांगितलं की, सध्या असा कोणताही पुरावा नाही की, 501.V2 ब्रिटनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनपेक्षा जास्त धोकादायक आणि वेगाने संसर्ग होणारा आहे. ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनी असा दावा केला होता. 

हे वाचा - कोरोना विषाणूचा नवा प्रकार जास्त घातक; मृतांची संख्या वाढणार?

ब्रिटनमध्ये आढळलेली नवीन स्ट्रेन किंवा जगभरातील इतर स्ट्रेनच्या तुलनेत अधिक धोकादायक आणि मृत्यू दर वाढवणारा कोरोना व्हायरसा नवा प्रकार आमच्या देशात आढळल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. 

दक्षिण आफ्रिकेतील प्रवाशांवर बंदीची घोषणा करताना ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हैनकॉक यांनी म्हटलं होतं की, दक्षिण आफ्रिकेत आढळलेली कोरोना व्हायरसची नवीन स्ट्रेन ही अधिक संवेदनशील असून चिंता वाढवणारी आहे. कारण याचा संसर्ग वेगाने होते आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या स्ट्रेनसारखाच असल्याचं हैनकॉक यांनी सांगितलं होतं. 

हे वाचा - कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण आहे का? 4 राज्यात होणार रंगीत तालीम

मखिजे यांनी यावर म्हटलं की, ब्रिटनच्या मंत्र्यांच्या शब्दात अशी समजूत झाली आहे की, दक्षिण आफ्रिकेतील कोरोना व्हायरसचा प्रकार हा ब्रिटनमध्ये दुसऱ्या लाटेचं प्रमुख कारण बनला आहे. खरंतर हे सत्य नाही. ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा प्रकार आणि दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेन सारखेच आहेत.

ब्रिटनच्या दक्षिण पूर्व भागातील केंटमध्ये सप्टेंबर महिन्यात सुरुवातीलाच तो आढळला होता. तर दक्षिण आफ्रिकेतील कोरोना हा एक महिन्यानंतर आढळला. या आधारावर दोन्ही देशातील प्रवासावर घातलेले निर्बंध दुर्दैवी आहेत असंही त्यांनी सांगितलं.

loading image
go to top