दक्षिण आफ्रिका: सोन्याच्या खाणीतील 950 कामगार सुखरूप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेत वीजपुरवठा खंडित झाल्याने "द सिबायनी' सोन्याच्या खाणीत अडकेल्या 950 कामगरांना सुखरूप बाहेर काढण्यास आज सकाळी यश आले.

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेत वीजपुरवठा खंडित झाल्याने "द सिबायनी' सोन्याच्या खाणीत अडकेल्या 950 कामगरांना सुखरूप बाहेर काढण्यास आज सकाळी यश आले.

सिबानये-स्टिलवॉटर माइनिंग कंपनीकडे फ्री स्टेट प्रांतातील बिट्रिक्‍स या सोन्याच्या खाणीचे व्यवस्थापन आहे. वेलकम शहरात काल रात्री आलेल्या वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे खाणीत एक हजार मीटर खाली काम करणारे 950 कामगारांना लिफ्टने वर आणणे अशक्‍य झाले होते. हे कामगार 24 तास आत अडकून पडले होते. या काळात त्यांच्यासाठी अन्न व पाण्याची सेय करण्यात आली होती, असे कंपनीने सांगितले. आज वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर सर्व खाण कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

सुटका झाल्यानंतर या कामगारांची वैद्यकीय तपासणी व समुपदेशन करण्यात आले आहे. सोमवारपासून (ता. 5) खाणीचे काम पुन्हा सुरू होईल, असे सांगण्यात आले. बुधवारी हे भीषण संकट ओढावले असतानाही कामगारांची सुटका करण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नव्हती. दक्षिण आफ्रिकेतील खाण सुरक्षेचा प्रश्‍न किती गंभीर आहे, हे या घटनेतून दिसले आहे, असे खाण कामगारांच्या संघटनेने म्हटले आहे. जमिनीखाली एक हजार मीटरवर जाण्यासाठी या खाणीत 23 मजले आहेत. वादळामुळे बिघडलेली लिफ्ट दुरुस्त झाल्याने गुरुवारी (ता. 1) 272 कामगारांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर 950 कामगारांना आज वर काढण्यात आले, अशी माहिती कंपनीचे प्रवक्ते जेम्स वेलस्टेड यांनी दिली.

Web Title: south africa gold mine trapped workers freed

टॅग्स