अर्धं विमान जळून खाक, अर्ध्याचे तुकडे झाले, 179 जणांचा मृत्यू, एअरलाइन्सच्या CEOने मागितली माफी

South Korea Flight Crash : दक्षिण कोरियात जेजू एअरलाइन्सचं विमान धावपट्टीवर घसरून झालेल्या दुर्घटनेत १७९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.
अर्धं विमान जळून खाक, अर्ध्याचे तुकडे झाले, 179 जणांचा मृत्यू, एअरलाइन्सच्या CEOने मागितली माफी
Updated on

दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर १८१ जणांना घेऊन जाणारं विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर दुर्घटना झाली. या दुर्घटनेत १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. जेजू एअरलाइन्सचं विमान धावपट्टीवर घसरलं आणि भिंतीला जाऊन धडकलं. ही दुर्घटना इतकी भीषण होती की विमानाचा अर्धा भाग जळून खाक झालाय, तर अर्ध्या विमानाचे तुकडे झाले आहेत. जेजू एअरलाइन्सच्या सीईओंनी माफी मागितलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com