South Korea Emergency Martial Law : दक्षिण कोरियात आधी आणीबाणी लागू, विरोध करताच लगेच हटविली, काय आहे प्रकरण?

South Korea Emergency : राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयाचा देशाच्या कारभारावर आणि लोकशाहीवर काय परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Emergency Declared In South Korea
Emergency Declared In South KoreaEsakal
Updated on

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी देशात मार्शल लॉ जाहीर केला होताटवि पण तो आता हटविण्यात आला आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेने देशाच्या राष्ट्राध्यक्षांची अवहेलना करण्यासाठी मतदान केले आणि ताबडतोब त्यांची मार्शल लॉ घोषणा मागे घेतली. उत्तरेकडील कम्युनिस्ट शक्तींपासून देशाचे रक्षण करण्यासाठी हा उपाय आवश्यक असल्याचे यून यांनी म्हटले होते. यून यांनी टेलिव्हिजन प्रसारणादरम्यान ही घोषणा केली होती. त्यांनी उत्तर कोरिया समर्थक शक्तींचा नायनाट करण्याचे आणि संवैधानिक लोकशाही प्रणालीचे रक्षण करण्याचे वचन दिले होते. मात्र, राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयाचा देशाच्या कारभारावर आणि लोकशाहीवर काय परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नव्हते

संसदेत आणीबाणीच्या विरोधात मतदान झाले आणि 190-0 असे बहुमत मिळाले, त्यामुळे आणीबाणी मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Emergency Declared In South Korea
Maharashtra CM: मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा, एकनाथ शिंदे म्हणाले, जनतेच्या मनात....
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com