दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाइ-इन यांनी अमेरिका आणि उत्तर कोरियाला केले आवाहन

यूएनआय
गुरुवार, 2 जुलै 2020

अमेरिकेत तीन नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणूकीपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यातील शिखर बैठक व्हायला हवी असे आवाहन दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाइ-इन यांनी केले आहे.

सोल - अमेरिकेत तीन नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणूकीपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यातील शिखर बैठक व्हायला हवी असे आवाहन दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाइ-इन यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बुधवारी एका सरकारी अधिकाऱ्याने पत्रकारांना ही माहिती दिली. मून यांनी मंगळवारी युरोपीय मंडळाचे अध्यक्ष चार्ल्स मिचेल यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.

सॅटेलाइटने टिपल्या चीनच्या कुरापती, समोर आली धक्कादायक माहिती

ट्रम्प व किम यांच्यात सर्वप्रथम २०१८ मध्ये सिंगापूरमध्ये बैठक झाली. त्यावेळी उत्तर कोरिया अण्वस्त्र उपक्रम मागे घेण्यासाठी करार होईल अशी दक्षिण कोरियाची आशा पल्लवित झाली होती, पण गेल्या वर्षी व्हिएतनाममधील दुसरी शिखर बैठक अपयशी ठरली. काही आर्थिक निर्बंध उठविण्याच्या बदल्यात मुख्य आण्विक केंद्र नष्ट करण्याचा किम यांचा प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळून लावला. मून यांनी सांगितले की, ही चर्चा पुन्हा सुरु होम्यासाठी आणखी एक शिखर बैठक होण्याची गरज आहे.

'तू मुलांना पुन्हा कधीच पाहू शकणार नाहीस'; त्याने पत्नीला मेसेज पाठवला अन्...

आण्विक उपक्रम आणि निर्बंध याबाबतची चर्चा आणि तोडगा अखेरीस उत्तर कोरिया-अमेरिका यांच्यातील चर्चेतूनच निघायला हवा. ही भूमिका दक्षिण कोरियाने अमेरिकेला कळविली असून तेथील अधिकारी त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एका दिवसापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री स्टीफन बिगन यांनी उभय देशांना चर्चेत सहभागी होऊन प्रगती करण्यासाठी अजूनही पुरेसा वेळ असल्याचे वक्तव्य केले होते.

भारतावर आरोप करणे बंद करा; नेपाळच्या पंतप्रधानांना पक्षातील नेत्यांनीच सुनावलं


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: South Korean President Moon Jae in has appealed to the United States and North Korea