सांगा.... देव आहे तरी कुठं?

वृत्तसंस्था
सोमवार, 22 एप्रिल 2019

श्रीलंकेत ख्रिश्‍चनांना लक्ष्य करून केलेल्या आठ बाँब हल्ल्यांनी हा देश हादरून गेला. या स्फोटांमध्ये 290 जणांना जीव गमवावा लागला असून, 500हून अधिकजण जखमी झाले आहेत.

कोलंबो: लहान-लहान मुलं गंभीर जखमी झाले असून, प्रचंड वेदनांनी ओरडत होती. अनेकजणझोपी गेलेत. ते पुन्हा न उठण्यासाठी. रक्तांचा सडा अन् अवयवांचे तुकडे चौफेर विखुरले होते. सांगा... देव आहे तरी कुठं?, अशी भावना शांता प्रसाद यांनी रुग्णालयात बोलून दाखवली.

जगभरात ईस्टर संडेनिमित्त ख्रिस्ती धर्मीयांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना श्रीलंकेत ख्रिश्‍चनांना लक्ष्य करून केलेल्या आठ बाँब हल्ल्यांनी हा देश हादरून गेला. या स्फोटांमध्ये 290 जणांना जीव गमवावा लागला असून, 500हून अधिकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांसह, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. शिवाय, सहा भारतीय नागरिकांचाही यामध्ये समावेश आहे. स्फोटानंतर अनेकांना शब्द गोठले आहेत. चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमले असताना हा स्फोट घडवून आणला. काय चूक होती? मुलांची. सांगा.... देव आहे तरी कुठं? असा प्रश्न अनेकजण उपस्थित करताना दिसतात.

दरम्यान, ईस्टर संडेनिमित्त भाविकांनी सकाळी विविध चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गर्दी केली असताना कोलंबोमधील सेंट अँटोनी चर्च, नेगोम्बो गावातील सेंट सेबॅस्टिअन चर्च आणि बॅटिकालोआ येथील एका चर्चमध्ये, तसेच कोलंबोमधील शांग्री-ला, सिनेमॉन ग्रॅंड आणि किंग्जबरी या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकाच वेळी बॉंबस्फोट घडवून आणण्यात आले. रविवारी (ता. 21) सकाळी 8.45 च्या सुमारास तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये हल्लेखोरांनी घडवून आणला. दुपारी आणखी दोन बॉंबस्फोटांमध्ये आणखी पाच जणांचे प्राण गेले. या स्फोटांमुळे "एलटीटीई'च्या पतनानंतर गेले श्रीलंकेत गेले दशकभर असलेली शांतता भंग पावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. मृतांमध्ये भारत, चीन, अमेरिका, ब्रिटनसह काही इतर देशांमधील 11 हून अधिक नागरिकांचाही समावेश आहे. जखमींमध्ये  पाकिस्तान, अमेरिका, मोरोक्को आणि बांगलादेशच्या नागरिकांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sri Lanka Blast People asking where is God