Sharad Pawar | शरद पवार यांच्याकडे युपीएचे नेतृत्व ? बैठकीत ठराव मंजूर

भाजपला जर रोखायचे असेल तर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal media

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला जर रोखायचे असेल तर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. याबाबत महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. आज मंगळवारी (ता.२९) राष्ट्रवादी युवक काँग्रेसची दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेस (Congress Party) आणि इतर पक्षांचे नेतृत्व करावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला. स्वतः पवार यावेळी उपस्थित होते. सदरील प्रस्ताव मंजूरही करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे देशातील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक असून त्यांनी देशाचे संरक्षण आणि कृषी मंत्री म्हणून देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. (Make Sharad Pawar Chief Of UPA, Nationalist Yuvak Congress Passed Resolution)

Sharad Pawar
औरंगाबादमध्ये सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, दोन गटांमध्ये हाणामारी

त्यांनी विरोधी पक्षनेता आणि केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे. सध्याच्या घडीला देशात बिगर भाजप राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना एकत्र आणण्याची महत्त्वाची भूमिका शरद पवार बजावू शकतात, असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (Nationalist Yuvak Congress) प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी बैठकीत व्यक्त केला आहे. पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) अध्यक्ष व्हावे असा प्रस्ताव मांडला. त्याला नेत्यांनी सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहे.

Sharad Pawar
तानाजी सावंत नाराज ? ठाकरेंच्या आदेशानंतरही शिवसंपर्क अभियानात गैरहजेरी

शरद पवार यांचे सर्व पक्षांशी चांगले संबंध आहेत. तसेच सध्याच्या घडीला ते त्यांना एकत्र आणू शकतात. दुसरीकडे पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. मात्र राष्ट्रवादीकडून मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावार स्वतः शरद पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com